छत्रपती शिवाजीमहाराज 'महाराजस्व अभियान' शिबिराचे नांदेडमध्ये आयोजन- अमृतला विशेष निमंत्रण!

छत्रपती शिवाजीमहाराज 'महाराजस्व अभियान' शिबिराचे नांदेडमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे अमृत संस्थे'ला विशेष निमंत्रण मिळाले आहे.

छत्रपती शिवाजीमहाराज 'महाराजस्व अभियान' शिबिराचे नांदेडमध्ये आयोजन- अमृतला विशेष निमंत्रण! मुख्य फोटो
छत्रपती शिवाजीमहाराज 'महाराजस्व अभियान' शिबिराचे नांदेडमध्ये आयोजन- अमृतला विशेष निमंत्रण! अतिरिक्त फोटो

नांदेड : महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये एका भव्य शासकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या वतीने आगामी २२ आणि २६ जुलै २०२६ रोजी ‘छत्रपती शिवाजीमहाराज 'महाराजस्व अभियान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे.

​नांदेडमधील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी संस्था म्हणून अमृत, नांदेडला या महत्त्वपूर्ण अभियानात सहभागी होण्यासाठी विशेष निमंत्रण प्राप्त झाले आहे.

​या महाराजस्व अभियान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ, आवश्यक दाखले आणि महसूल विभागाशी संबंधित सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

अमृत संस्था' आपल्या सामाजिक दायित्वाच्या भावनेतून या शिबिरात सक्रिय सहभाग नोंदवणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Saurabh Kulkarni News publisher name | Date: 15-07-2026 News publication date | Time: 04:11 PM News publication time | Views: 98 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news
Publisher: Saurabh Kulkarni News publisher name | Date: 15-07-2026 News publication date | Time: 04:11 PM News publication time | Views: 98 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement