जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा व बाजीराव करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी ,नागझिरा रोड - साकोली, जिल्हा भंडारा यांचे सयुक्त विद्यमाने दि. १५ जूलै २०२६ रोजी पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा साकोली येथील बाजीराव करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी ,नागझिरा रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा व बाजीराव करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी ,नागझिरा रोड - साकोली, जिल्हा भंडारा यांचे सयुक्त विद्यमाने जागतिक कौशल्य दिनानिमित्त मा. ना. मंगल प्रभात लोढा मंत्री - कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता यांची संकल्पनेला उद्देशून दि. १५ जूलै २०२६ रोजी पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात १५ पेक्षा जास्त नामांकित कंपन्या सहभागी असून ५३५ पेक्षा जास्त पद भरती करण्यात येणार आहेत. त्यामुळे बेरोजगार तसेच रोजगाराची संधी शोधत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. जिल्ह्यातील नामवंत कंपनी पैकी २ अशोक लेलँड लिमिटेड व सनफ्लॅग स्टील अँड आयरन सुद्धा ह्या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. भारतीय स्टेट बँक लाइफ, श्रीराम फायनान्स, एल.आय.सी, CreditAccess ग्रामीण बँक, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, फ्युजन फायनान्स ह्या वाणिज्य क्षेत्रातील बँक सहभागी होणार आहेत. शैक्षणिक पात्रता ही विविध पदानुसार अवलंबित असून १०वी,१२वी , आय. टी. आय, कोणत्याही शाखेतील पदवीधर, अभियांत्रिकी पदवीधर, पदव्योत्तर शिक्षण उत्तीर्ण विद्यार्थी पात्र उमेदवार असेल. ह्या सुवर्ण संधीचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार युवक युवतींनी करून घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे. दिनांक :- १५/०७/२०२६ वेळ : दु. ११:०० ते ३:०० स्थळ - बाजीराव करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी, नागझिरा रोड, साकोली
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment