श्री. मुकुंदजी आफळे :- सामाजिक समरसता गती विधी (पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक) व श्री. विजयजी फडके :- सामाजिक सदभाव (सातारा जिल्हा संयोजक) यांची अमृत जिल्हा कार्यालयास सदिच्छा भेट दिली
सातारा : अमृत संस्थेच्या सातारा कार्यालयाला सामाजिक समरसता गतीविधीचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक मुकुंदजी आफळे तसेच सामाजिक सद्भावचे सातारा जिल्हा संयोजक विजयजी फडके यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी अमृत संस्थेच्या विविध लोकाभिमुख योजना, कौशल्य विकास उपक्रम, रोजगार निर्मिती, शासकीय योजनांचा लाभ, उद्योजकता विकास तसेच समाजहिताच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. या योजनांची माहिती जाणून घेतल्यानंतर मुकुंदजी आफळे व विजयजी फडके यांनी "अमृत संस्थेच्या योजना अत्यंत उपयुक्त असून त्यांचा अधिकाधिक प्रसार व प्रचार होणे आवश्यक आहे. समाजातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत या योजना पोहोचाव्यात यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू. तसेच अमृत संस्थेच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा." अशा भावना व्यक्त केल्या.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment