महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पात्र विद्यार्थ्यांसाठी सी-डॅकच्या निवडक पदव्युत्तर पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी महत्त्वाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सी-डॅकच्या (C-DAC) निवडक पदव्युत्तर पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी अमृत योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य देण्यात येणार असून, पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम:
योजनेअंतर्गत ६ महिन्यांच्या (९०० तास) कालावधीचे खालील पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत – PG-DAC (Post Graduate Diploma in Advanced Computing) PG-DMC (Post Graduate Diploma in Mobile Computing) PG-DESD (Post Graduate Diploma in Embedded System Design) PGCP-AI (Post Graduate Certificate Programme in Artificial Intelligence) PG-DBDA (Post Graduate Diploma in Big Data Analytics) PG-DITISS (Post Graduate Diploma in IT Infrastructure Systems & Security) तसेच प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये CCNS (Certificate Course in Network Security) या अभ्यासक्रमाची निवड करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी पात्रता : अर्जदाराने अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी पात्रता निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे. आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करणे बंधनकारक आहे.
आवश्यक कागदपत्रे : अधिवास (Domicile) प्रमाणपत्र आधार कार्ड (Unmasked) पॅन कार्ड शाळा सोडल्याचा / ट्रान्सफर सर्टिफिकेट रद्द केलेला धनादेश (Cancelled Cheque) उमेदवाराचे स्वघोषणापत्र बारावी (HSC) गुणपत्रिका / प्रमाणपत्र शैक्षणिक पात्रतेचे अद्ययावत प्रमाणपत्र C-CAT प्रवेश परीक्षेचा निकाल (July-2025) फी भरल्याची पावती लाभार्थ्यांची निवड अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून वेळेत अर्ज सादर करावा.अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील अशा जाती-जमातींसाठी कार्यरत आहे, ज्यांना इतर कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळामार्फत लाभ मिळत नाही. ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, नायर, अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, नायडू, राजपुरोहित, सेनगुनथर, येलमार, त्यागी आदी समाजांतील वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असलेले आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.
नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क : अमृत विभाग व जिल्हा कार्यालय, पुंडलिकनगर रोड, सेक्टर-४, सिडको, पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर – ४३१००१. संपर्क : ७३९१०६५४७५ / ९४०३२००६०६ अधिक माहितीसाठी अमृतच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahaamrut.org.in/ तसेच अधिकृत सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment