AIIMS, IIT, IIM, IIIT मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अमृतची अर्थसहाय्य योजना

अमृत संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पात्र विद्यार्थ्यांना AIIMS, IIT, IIM आणि IIIT मध्ये उच्च शिक्षणासाठी प्रतिमहिना ₹१०,००० प्रोत्साहनपर अर्थसहाय्य दिले जात आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज अमृत कार्यालयात सादर करावा.

AIIMS, IIT, IIM, IIIT मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अमृतची अर्थसहाय्य योजना मुख्य फोटो
मुख्य फोटो

अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी AMRUT) मार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी AIIMS, IIT, IIM आणि IIIT या देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी विशेष अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत संबंधित संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत प्रति विद्यार्थी प्रतिमहिना ₹१०,००० इतके प्रोत्साहनपर अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी ११ महिन्यांपर्यंत ही मदत अनुज्ञेय राहील. सदर अर्थसहाय्य वर्षातून दोन वेळा, प्रत्येक सेमिस्टर यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. पुढील सत्रासाठी लाभ घेण्यासाठी मागील सत्रातील गुणपत्रिकेची स्वसाक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थी : खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कोणत्याही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अमृतच्या लक्षित गटातील AIIMS, IIT, IIM आणि IIIT मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

आवश्यक कागदपत्रे फोटो स्वाक्षरी चालू आर्थिक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र / EWS प्रमाणपत्र अधिवास (Domicile) प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला / बदली प्रमाणपत्र नावात बदल असल्यास राजपत्र / विवाह प्रमाणपत्र शैक्षणिक संस्थेचे ओळखपत्र मागील परीक्षेचे गुणपत्रक Cancelled Cheque Bonafide Certificate Hosteller Certificate (लागू असल्यास) इच्छुक विद्यार्थ्यांनी www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. तसेच अर्जाची स्वाक्षरी केलेली हार्डकॉपी आणि सर्व स्वसाक्षांकित कागदपत्रांसह अमृत विभाग व जिल्हा कार्यालयात सादर करावी. कार्यालयाचा पत्ता : अमृत विभाग व जिल्हा कार्यालय, पुंडलिकनगर रोड, सेक्टर-४, सिडको, पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर – ४३१००९. अधिक माहितीसाठी संपर्क : ७३९१०६५४७५ ९४०३२००६०६

Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 13-07-2026 News publication date | Time: 01:36 PM News publication time | Views: 101 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 13-07-2026 News publication date | Time: 01:36 PM News publication time | Views: 101 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement