अमृत संस्थेमुळे अहिल्यानगर मधील शुभंकर जोशी यांचे "रिमोट पायलट"होण्याचे स्वप्न पूर्ण

अहिल्यानगर मधील शुभंकर जोशी यांचे अमृत संस्थे मुळे "रिमोट पायलट"होण्याचे स्वप्न पुर्ण झाले आहे.

अमृत संस्थेमुळे अहिल्यानगर मधील शुभंकर जोशी यांचे "रिमोट पायलट"होण्याचे स्वप्न पूर्ण मुख्य फोटो
अमृत संस्थेमुळे अहिल्यानगर मधील शुभंकर जोशी यांचे "रिमोट पायलट"होण्याचे स्वप्न पूर्ण अतिरिक्त फोटो

अहिल्यानगर : अमृत संस्थेच्या माध्यमातून अहिल्यानगर मधील राहुरी येथील शुभंकर दीपक जोशी यांनी परभणी येथील DGCA मान्यताप्राप्त अमृत ड्रोन पायलट प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून DGCA अधिकृत रिमोट पायलट म्हणून पात्रता प्राप्त केली आहे.त्यांना हे संपूर्ण प्रशिक्षण महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेच्या माध्यमातून मिळाले आहे.

अहिल्यानगर येथील अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांच्या माध्यमातून त्यांना "अमृत ड्रोन प्रशिक्षण" योजनेची माहिती मिळाली. त्यानंतर शुभंकर जोशी यांचे अमृत कार्यालय अहिल्यानगर येथे सर्व कागदपत्र पूर्तता करून रजिस्ट्रेशन करण्यात आले. त्यानंतर या प्रशिक्षणासाठी निवड होऊन दि. २३ जून ते ६ जुलै २०२६ या कालावधीत परभणी येथे आयोजित प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.

प्रशिक्षणादरम्यान त्यांनी ड्रोन उड्डाण, हवाई सुरक्षा नियम, एअरस्पेस व्यवस्थापन, मिशन प्लॅनिंग,हवामानशास्त्र,आपत्कालीन परिस्थिती व्यवस्थापन तसेच प्रत्यक्ष ड्रोन उड्डाणाचे प्रशिक्षण घेतले. याशिवाय ड्रोन मॅपिंग,सर्व्हेक्षण, फोटोग्रामेट्री आणि भू-स्थानिक (Geospatial) तंत्रज्ञानाचा अभ्यास करून आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात केले.

ड्रोन क्षेत्रातील हे प्रशिक्षण त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, भविष्यात कृषी, सर्व्हेक्षण, पायाभूत सुविधा, औद्योगिक तपासणी, आपत्ती व्यवस्थापन आणि भू-स्थानिक क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून एक यशस्वी व्यावसायिक होण्याचा व समाजोपयोगी कार्य करण्याचा त्यांचा मानस आहे. याबद्दल त्यांनी अमृत संस्थेच्या सर्व टीम चे आभार मानले आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 11-07-2026 News publication date | Time: 09:22 PM News publication time | Views: 315 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 11-07-2026 News publication date | Time: 09:22 PM News publication time | Views: 315 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement