अमृताच्या योजनेमुळे मिळत आहे ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगार होण्याची संधी

अमृत चा प्रशिक्षणातून उंच भरारी कारंजाच्या राज उमेश तिवारी यांची ड्रोन उद्योजकतेकडे यशस्वी वाटचाल

अमृताच्या योजनेमुळे मिळत आहे ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगार होण्याची संधी मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ड्रोन पायलट प्रशिक्षण योजनेमुळे अनेक युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोजगार आणि स्वावलंबनाची नवी दिशा मिळत आहे. याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील राज उमेश तिवारी.


राज उमेश तिवारी यांनी अमृतच्या ड्रोन पायलट प्रशिक्षण योजनेचा लाभ घेत परभणी येथे आयोजित प्रशिक्षण बॅचमध्ये सहभाग नोंदविला. या प्रशिक्षणादरम्यान त्यांना ड्रोनचे तांत्रिक ज्ञान, सुरक्षित उड्डाण, नियमावली, देखभाल, तसेच कृषी क्षेत्रातील ड्रोनचा प्रभावी वापर याबाबत सखोल मार्गदर्शन मिळाले. अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय उभारण्याची प्रेरणा मिळाली.


आज राज उमेश तिवारी हे ड्रोन सेवा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहेत. शेतीमध्ये औषध फवारणी, खतांची फवारणी, पीक सर्वेक्षण, जमिनीचे मोजमाप, तसेच विविध शासकीय व खासगी क्षेत्रांमध्ये ड्रोन सेवांची वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी उद्योजकतेचा मार्ग निवडला आहे. हा व्यवसाय केवळ त्यांच्या आर्थिक प्रगतीलाच चालना देणार नाही, तर परिसरातील शेतकऱ्यांनाही आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देईल.


अमृतच्या या प्रशिक्षणामुळे एका युवकाला केवळ कौशल्यच मिळाले नाही, तर रोजगार शोधणाऱ्यापासून रोजगार निर्माण करणाऱ्या उद्योजकाकडे बदलण्याची संधी मिळाली आहे. राज उमेश तिवारी यांची ही यशोगाथा इतर युवकांसाठी प्रेरणादायी आहे. योग्य प्रशिक्षण, जिद्द आणि आत्मविश्वास यांच्या बळावर आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून स्वावलंबी होणे शक्य असल्याचा विश्वास त्यांच्या प्रवासातून निर्माण होतो.


अमृतच्या कौशल्य विकास उपक्रमांमुळे अशा अनेक युवकांच्या आयुष्याला नवी दिशा मिळत असून, कौशल्याधारित रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट प्रत्यक्षात साकार होत आहे. राज उमेश तिवारी यांना त्यांच्या आगामी ड्रोन व्यवसायासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 09-07-2026 News publication date | Time: 11:46 AM News publication time | Views: 253 Number of times this news has been viewed | District: Washim Related district of the news
Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 09-07-2026 News publication date | Time: 11:46 AM News publication time | Views: 253 Number of times this news has been viewed | District: Washim Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

A
Anandrao yadorao shende
09-07-2026 05:20 PM

I like dron business

Write a Comment
0 / 50 words
Advertisement