जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला, मॉडेल करिअर सेंटर, अकोला तसेच श्री गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, मूर्तीजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. १३ जुलै २०२६ रोजी "पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा" आयोजित करण्यात आला आहे.
- हा रोजगार मेळावा सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत श्री गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, मेन रोड, मूर्तीजापूर, जि. अकोला येथे संपन्न होणार आहे.
- या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित खासगी कंपन्या सहभागी होणार असून अकाउंटंट, क्वालिटी अश्युरन्स, ट्रेनी इंजिनिअर, फार्मास्युटिकल्स, रिलेशनशिप ऑफिसर, केंद्र व्यवस्थापक, क्रेडिट असिस्टंट, मशीन असोसिएट, ऑपरेटर, वेल्डर, डाय मेकर आदी पदांसाठी एकूण १२१ रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.
- पात्रतेनुसार १२ वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर तसेच बी.फार्म/एम.फार्म उत्तीर्ण उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
- इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रीय करिअर सेवा (NCS) पोर्टलवर नोंदणी करून संबंधित रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा. तसेच मेळाव्याच्या दिवशी बायोडाटा, आधार कार्ड, शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे व अनुभव प्रमाणपत्रांच्या छायाप्रती सोबत आणाव्यात.
- अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा ०७२४-२४३३८४९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment