रानभाज्या म्हणजे कोणतीही मशागत, खते किंवा निगा न राखता निसर्गात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या भाज्या होत. या प्रामुख्याने डोंगर, जंगल, शेताचे बांध आणि माळरानांवर पावसाळ्यात किंवा विशिष्ट ऋतूंमध्ये आपोआप येतात.
रानभाज्या म्हणजे कोणतीही मशागत, खते किंवा निगा न राखता निसर्गात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या भाज्या होत. या प्रामुख्याने डोंगर, जंगल, शेताचे बांध आणि माळरानांवर पावसाळ्यात किंवा विशिष्ट ऋतूंमध्ये आपोआप येतात.
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुरबाड, शहापूर तालुक्यातील रान हिरवंगार झाले असून, डोंगर-दऱ्यात *नैसर्गिक रानभाज्या* मोठ्या प्रमाणात उगवल्या आहेत. आज सकाळपासूनच बाजारात शेवळं, टाकळा, कुरडू, फोडशी, करटुली यांसारख्या रानभाज्यांनी हजेरी लावली आहे.
*आदिवासी महिलांचा हातभार*
मुरबाड, टोकावडे, म्हसा, पालघर परिसरातील आदिवासी महिला पहाटेच डोंगरात जाऊन या भाज्या गोळा करतात आणि मुंबई-ठाण्याच्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जातात. "या भाज्या कोणतेही खत किंवा कीटकनाशक न वापरता आपोआप उगवतात, म्हणून हा खरा *ऑरगॅनिक रानमेवा* आहे."
*या पावसाळ्यात 'या' रानभाज्या नक्की खा* *शेवळं (शेवली)* - लोह, कॅल्शियम व फायबरने समृद्ध. पचनक्रिया सुधारते. बोंड्याचा पाला किंवा काकड घालून बनवली तर घशात खवखवत नाही. *टाकळा* - पोट साफ करण्यासाठी उत्तम. पावसाळ्यात हमखास मिळते. *फोडशी* - कांदा-लसूण घालून केलेली परतलेली भाजी चवीला अप्रतिम.
*करटुली* - 'रानातील कारले' म्हणून ओळखली जाते. मधुमेहावर गुणकारी.
*कुरडू* - हिरव्या पानांची भाजी, भाकरीसोबत खाल्ली जाते.
*अळू/तेरा* - पावसाळ्यातील अळूच्या पानांपासून वड्या व पातळ भाजी बनते.
*आयुर्वेदिक महत्त्व*
अनेक रानभाज्या औषधी आहेत. *करटोली मधुमेहावर, आघाडा पोटदुखीवर, तर टाकळा खोकल्यावर* गुणकारी आहे. गर्भवती महिला व बालकांसाठीही या भाज्या पौष्टिक मानल्या जातात.
ज्याप्रमाणे आपल्या शरीराला आजारपणापासून वाचवण्यासाठी आपण औषध घेतो, त्याचप्रमाणे या भाज्या आजार दूर ठेवण्यास मदत करतात.
*नागरिकांना आवाहन*
स्थानिक जाणकारांनी सांगितले की, रानभाज्या ओळखूनच घ्याव्यात. काही भाज्या कच्च्या खाल्ल्यास त्रास होऊ शकतो. शेवळं, सुरण यासारख्या भाज्या नीट शिजवूनच खाव्यात.
पावसाळ्यासोबत येणारा हा रानमेवा नक्की चाखा. नैसर्गिक, सकस व औषधी गुणधर्मांनी युक्त या भाज्या आरोग्यासाठी वरदान आहेत.
ठाण्यात रानभाज्या कुठे मिळतात? डोंबिवली बाजीप्रभू चौक. ठाणे भाजी मार्केट (जांभळी नाका): ठाणे स्टेशन रोडवरील हा सर्वात मोठा घाऊक आणि किरकोळ भाजी बाजार आहे. येथे पहाटे ४ ते ८ या वेळेत थेट मुरबाड, टोकावडे, म्हसा, पालघर वरून आलेल्या ताज्या रानभाज्या मिळतात. गावदेवी भाजी मार्केट (नौपाडा): येथील स्थानिक मंडईत अनेकदा रानभाज्या उपलब्ध असतात. स्थानिक विक्रेते: ठाणे पश्चिमेकडील गोखले रोड, तलावपाळी परिसर आणि कळवा येथील स्थानिक भाजी विक्रेत्यांकडे या भाज्या मिळतात.
-संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment