अहिल्यानगर मधिल साक्षी नागेश सागडे हिला अमृत संस्थेकडून टँकलेखन व लघुलेखन योजनेचा (जीसीसी-टीबीसी) लाभ मिळाला असून तिने अमृत कार्यालयाला भेट दिली.
अहिल्यानगर : अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या टंकलेखन व लघुलेखन योजनेचा (जीसीसी-टीबीसी) लाभ मिळालेल्या साक्षी नागेश सागडे या विद्यार्थिनीने अमृत संस्थेचे आभार मानले आहेत. हा कोर्स यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्यानंतर तिला ‘अमृत’तर्फे संपूर्ण फीचा परतावा मिळाला आहे.या योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल साक्षी नागेश सागडे हिने अमृत कार्यालय येथे भेट देऊन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक मा श्री विजय जोशी,अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे आणि संपूर्ण अमृत टीमचे आभार मानले. लक्ष्यित गटातील युवक व युवती यांनी अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन तिने केले. ‘अमृत’च्या लक्ष्यित गटातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींपर्यंत अमृत संस्थेच्या योजना पोहोचवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी केले आहे .यावेळी अमृत सखी गौरी कुलकर्णी हिने तिचे स्वागत करत अमृतच्या इतर योजनांची सविस्तर माहिती दिली. अधिक माहितीसाठी अमृत कार्यालय पत्ता : अमृत कार्यालय, वरुण अपार्टमेंट,आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी,अहिल्यानगर - 414003 संपर्क क्रमांक : 9112228769 अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार, हिंदू नेपाळी इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment