महिलांनी गट स्थापन करून स्वयंरोजगार उभारणे गरजेचे

कौशल्य विकाससंदर्भात महिलांसाठी शिवणकला प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोप

महिलांनी गट स्थापन करून स्वयंरोजगार उभारणे गरजेचे  मुख्य फोटो
महिलांनी गट स्थापन करून स्वयंरोजगार उभारणे गरजेचे  अतिरिक्त फोटो

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने व आदर्श संस्कार मंडळाद्वारे संचालित स्वावलंबन आयाम अंतर्गत जीवन कौशल्य विकासांतर्गत महिलांसाठी शिवणकला प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी गट स्थापन करून स्वयंरोजगार उभा करावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर सेवा प्रमुख विलास जोशी यांनी याप्रसंगी केले. कार्यशाळा भावसार पंच बंगला, शिवाजीनगर येथे पार पडली. याप्रसंगी व्यासपीठावर शुचिता जोशी ( राष्ट्रसेविका समिती अकोला जिल्हा सहकार्यवाहीका) . नगरसेविका मंजुषा शेळके, नगरसेवक नितीन ताकवले,विलास जोशी ( राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर सेवा प्रमुख) , शिवणकला केंद्राच्या शिक्षिका शीतल गिरी यांची उपस्थिती होती. आदर्श शिवणकला केंद्र व वैष्णवी शिवणकला केंद्र यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत ३०० पेक्षा महिलांनी शिवणकला प्रशिक्षण घेतले. महिलांना शीतल गिरी यांनी प्रशिक्षण दिले. आदर्श संस्कार मंडळ, अकोला यांच्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनी महिलांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सूत्रसंचालन ज्योती रानडे यांनी केले.

Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 29-06-2026 News publication date | Time: 01:06 PM News publication time | Views: 171 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news
Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 29-06-2026 News publication date | Time: 01:06 PM News publication time | Views: 171 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

V
Vilas joshi
30-06-2026 01:49 PM

या प्रशिक्षण माझा उद्देश हा एकच आहे स्वालंबन होणे सेवा वस्तीतील मातृशक्ती स्वावलंबी झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून मेहंदी प्रशिक्षण वर्ग व शिवणकाला कला केंद्र च्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे हा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अकोला महानगर सेवा विभाग

Write a Comment
0 / 50 words
Advertisement