एम.पी.एस.सी राज्यसेवा मुख्य परीक्षेत मोठा बदल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या स्वरूपात ऐतिहासिक बदल जाहीर केला आहे. २०२७ पासून वैकल्पिक विषय रद्द, गुणपद्धतीतही बदल झाला आहे.

एम.पी.एस.सी राज्यसेवा मुख्य परीक्षेत मोठा बदल  मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या स्वरूपात मोठा बदल जाहीर केला आहे. २०२७ पासून मुख्य परीक्षेत असलेला वैकल्पिक (Optional) विषय पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्व उमेदवारांना समान अभ्यासक्रम आणि समान प्रश्नपत्रिकांच्या आधारे परीक्षा द्यावी लागणार आहे. यापूर्वी उमेदवारांना त्यांच्या आवडीचा एक वैकल्पिक विषय निवडून त्याचे दोन पेपर द्यावे लागत होते. प्रत्येक पेपर २५० गुणांचा असल्याने वैकल्पिक विषयाचे एकूण ५०० गुण अंतिम गुणवत्ता यादीत मोजले जात होते. आता हे दोन्ही पेपर रद्द करण्यात आले आहेत. नवीन पद्धतीनुसार मुख्य परीक्षेत मराठी, इंग्रजी, निबंध आणि चार सामान्य अध्ययन (GS-I, GS-II, GS-III आणि GS-IV) असे सात अनिवार्य पेपर असतील. यापैकी मराठी आणि इंग्रजी हे पात्रताधारित (Qualifying) पेपर असतील. या दोन्ही विषयांमध्ये किमान गुण मिळवणे आवश्यक असले तरी त्यांचे गुण अंतिम गुणवत्ता यादीत समाविष्ट केले जाणार नाहीत. या बदलामुळे मुख्य परीक्षेतील गुणवत्ता गुण १७५० वरून १२५० इतके झाले आहेत. मुलाखतीचे गुण २७५ इतकेच कायम राहणार आहेत. त्यामुळे अंतिम गुणवत्ता यादीसाठी एकूण गुण २०२५ ऐवजी १५२५ असतील. या निर्णयामुळे सर्व उमेदवारांना समान संधी मिळेल, वैकल्पिक विषयामुळे निर्माण होणारी गुणांतील तफावत कमी होईल आणि स्पर्धा अधिक पारदर्शक व न्याय्य होईल, अशी अपेक्षा आयोगाने व्यक्त केली आहे. आता विद्यार्थ्यांनी वैकल्पिक विषयाऐवजी सामान्य अध्ययन (GS) आणि निबंध या विषयांच्या तयारीवर अधिक भर देणे आवश्यक ठरणार आहे.

संदर्भ -https://mpsc.gov.in/

Publisher: आदित्य कुलकर्णी News publisher name | Date: 29-06-2026 News publication date | Time: 10:04 AM News publication time | Views: 92 Number of times this news has been viewed | District: Nagpur Related district of the news
Publisher: आदित्य कुलकर्णी News publisher name | Date: 29-06-2026 News publication date | Time: 10:04 AM News publication time | Views: 92 Number of times this news has been viewed | District: Nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement