अमृत"(महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) संस्थेच्या विविध योजनांची माहिती
"अमृत"(महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) - महाराष्ट्र राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी,युवक-युवती व इतर उमेदवार इत्यादींच्या विकास घडवण्यासाठी ‘अमृत’ अर्थात महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी या स्वतंत्र संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाने दिनांक 22 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयाद्वारे केलेली आहे.अमृत संस्थेचे मुख्यालय पुणे येथे आहे. अमृत या संस्थेच्या योजना प्रशासकीय मंडळाच्या च्या मान्यतेने कार्यान्वित होतात. नियामक मंडळाच्या मान्यतेने मंजूर झालेल्या योजना तसेच माननीय व्यवस्थापकीय संचालक-अमृत यांना प्राप्त झालेल्या विविध अधिकारांच्या कार्यकक्षेत विविध प्रकारच्या योजना कार्यान्वित करण्यात येत असतात. अमृत संस्थेच्या ठराविक योजणांची माहिती पुढीलप्रमाणे.पुढील सर्व योजनाचा लाभ अमृत संस्थेच्या लक्षित गटातील ज्यांचे उत्पन्न आठ लक्ष पर्यंत आहे ते नियम व अटीसह घेऊ शकतात.
▪️शैक्षणिक अर्थसहाय्य - AIIMS - IIT - IIM - IIIT प्रवेश पात्र विद्यार्थी यांना अर्थसहाय्य.
▪️ संगणक टंकलेखन व लघुलेखन योजना (GCC_TBC) उत्तीर्ण विद्यार्थी यांना कोर्स ची भरलेली रक्कम परत मिळते
▪️(C-DAC).माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स तथा उच्च कार्यक्षमता संगणक प्रशिक्षण योजना.या कोर्से साठी प्रवेश घेतल्यानंतर लागणारी संपूर्ण रक्कम मिळते.
▪️ संघ लोकसेवा आयोग (UPSC) - नागरी सेवा पूर्व परीक्षा - नागरी सेवा मुख्य परीक्षा वनसेवा पूर्व परीक्षा - वनसेवा मुख्य परीक्षा - अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा - अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा
▪️महाराष्ट्र लोकसेवा (MPSC) - महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - राज्य सेवा मुख्य परीक्षा - कृषी सेवा मुख्य परीक्षा - वन सेवा मुख्य परीक्षा - महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा. - दिवाणी न्यायाधीश पूर्व परीक्षा - दिवाणी न्यायाधीश मुख्य परीक्षा - अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा - अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा - अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा - निरीक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा - महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा - महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा - महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा.
▪️ड्रोन पायलेट प्रशिक्षण योजना
▪️अमृत बिझनेस-इनक्यूबेशन(Incubation) - BHAU Incubation Prograम - MSSU Buiseness Incubation
▪️. तांत्रिक रोजगार प्रशिक्षण (IGTR) -- आयजीटीआर दीर्घकालीन(Long Term) - सीएनसी तंत्रज्ञानातील मास्टर प्रमाणपत्र अभ्यासक्रम - यंत्र देखभालमधील प्रगत प्रमाणपत्र अभ्यासक्रम - ज्युनियर टेक्निशियन टूल आणि डाय मेकर - सीएनसी मशीनिंगमधील प्रगत प्रमाणपत्र अभ्यासक्रम - सीएनसी टर्निंग आणि मिलिंगमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम - मेकाट्रॉनिक्समधील पदव्युत्तर पदविका - सहाय्यक ऑपरेटर सीएनसी टर्निंग - टूल रूम - मेकाट्रॉनिक्समधील मास्टर प्रमाणपत्र अभ्यासक्रम - फ्रंट लाइन ज्युनिअर सुपरवायझर - बांधकाम (स्ट्रक्चरल डिझाइन आणि ॲनालिसिसमधील ॲडव्हान्स डिप्लोमा) - वरिष्ठ तंत्रज्ञ, यंत्र देखभाल आणि स्वयंचलन (एडीएमएमए) - सहाय्यक ऑपरेटर सीएनसी टर्निंग - टीआयएल रूम - सीएनसी मशीनिंगमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम - टूल आणि डाय (43)मॅन्युफॅक्चरिंगमधील पदव्युत्तर पदविका - वरिष्ठ तंत्रज्ञ, यंत्र देखभाल आणि स्वयंचलन (एडीएमएमए) - सहाय्यक ऑपरेटर सीएनसी टर्निंग – टीआयएल रूम - सीएनसी मशीनिंगमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम - टूल आणि डाय मॅन्युफॅक्चरिंगमधील पदव्युत्तर पदविका - ज्युनियर डिझायनर कॅड/कॅम (कॅड/कॅममधील मास्टर सर्टिफिकेट कोर्स) - टूल डिझाइन आणि कॅड/कॅम मधील पदव्युत्तर पदविका -- IGTR SHORTTERM (अल्पकालीन) - Ansys-CAE - सीएनसी मशीनिंग लेथ - सीएनसी मशीनिंग ईडीएम - सीएनसी मशीनिंग वायर-कट - बेसिक न्यूमॅटिक्स - युनिग्राफिक्स-सीएड - Catia-CAD - Creo-CAD - इलेक्ट्रो हायड्रॉलिक्स - स्काडा - ॲडव्हास न्यूमॅटिक्स - पीएलसी प्रोग्रामिंग - मूलभूत हायड्रोलिक्स - एम्बेडेड सिस्टम्स - Delcam CAD/CAM - ई-कॅड - सॉलिडवर्क्स-सीएडी - ऑटोकॅड सिव्हिल - HMI - एकूण स्टेशन वापरून नागरी सर्वेक्षण - इलेक्ट्रो न्यूमॅटिक्स - रोबोटिक्स आणि ऑटोमेशन - सेन्सर्स आणि ऍप्लिकेशन्स - ऑटो CAD - स्टॅड प्रो - 3Ds कमाल - Revit आर्किटेक्चर - Mastercad CAD/CAM - 3D प्रिंटिंग - सीएनसी मशीनिंग मिलिंग
▪️CIPET अमृत कौशल्य विकास प्रशिक्षण -- सीआयपीईटी दीर्घकालीन(CIPET LONGTERM) - मशीन ऑपरेटर - प्लास्टिक प्रक्रिया (एमओ-पीपी) * मशीन ऑपरेटर इंजेक्शन मोल्डिंग (एमओ-आयएम) * मशीन ऑपरेटर – टूल रूम * मशीन ऑपरेटर आणि प्रोग्रामर-सीएनसी लेथ * मशीन ऑपरेटर आणि प्रोग्रामर-सीएनसी मिलिंग * प्लास्टिक उत्पादन निर्मिती ऑपरेटर (PPMO) -- सीआयपीईटी अल्पकालीन (CIPET SHORT TERM) - युनिग्राफिक्स सीएडी/कॅम - सॉलिडवर्क - ऑटोकॅड - CREO - मास्टर CAM - सीएनसी मशीनिंग लेथ. - सीएनसी मशीनिंग मिलिंग - सीएनसी मशीनिंग वायर कट ईडीएम - सीएनसी मशीनिंग ईडीएम.
▪️NIELET कौशल्य विकास प्रशिक्षण- NIELIT SHORT TERM(अल्पकालीन) - माहिती सुरक्षा फाउंडेशन कोर्स - सायबर सुरक्षा सहाय्यक - आर्टिफिशियल इंटेलिजेंट असिस्टंट - प्रमाणित वेब विकसक - प्रमाणित डेटा विश्लेष - पायथन वापरून मशीन लर्निंगमधील पायाभूत अभ्यासक्रम - Python आणि SQL सह डेटा विश्लेषण - ड्रोन ऍप्लिकेशन डेव्हलपर - इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) सहाय्यक - व्हीएलएसआय डिझाइनमधील पायाभूत अभ्यासक्रम
▪️वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
▪️अमृत उद्यम कौशल्य प्रशिक्षण - अमृत महाराष्ट्र - अमृत महाराष्ट्र -समुदाय पत्रकार - अमृत - मोबाईल फिल्म मेकिंग - अमृत - ॲनिमेशन - Tourisam(पर्यटन) आणि Hospitality - अमृत अलंकार व इमिटेशन ज्वेलरी मेकर - अमृत आरी वर्क (कपडे, तयार कपडे आणि गृहसजावटीच्या वस्तू) - अमृत अन्नपूर्णा (अन्न प्रक्रिया) - लॉजिस्टिक्स(LOGISTICS) - अमृत पेठ ( E- Commerce platform ) - अमृत -जागतिक व्यापार (निर्यात -आयात )
▪️ इलेक्ट्रॉनिक्स - अमृत सूर्य मित्र -सौर मित्र इंस्टालेशन टेक्निशियन - अमृत E-Repair मित्र (मोबाईल आणि लॅपटॉप रिपेरिंग
▪️ अमृत बेकरी प्रशिक्षण (सहाय्यक बेकिंग तंत्रज्ञ )
▪️Managment (व्यवस्थापन) - Amrut Digipreneur (डिजिटल आणि सेल्स मार्केटिंग एक्सिकिटीव्ह) - अमृत ग्लॅमर -व्यवसायिक मेकअप आर्टिस्ट - अमृत बायो इंझाइम - अमृतपेठ -थेट बाजारपेठ व्यवस्थापक - अमृत -उद्योग कौशल्य वर्धन(लघु)प्रशिक्षण - अमृत फ्रँचायझी विक्री आणि व्यवसाय विकास - फॅशन डिझायनिंग
▪️उद्योजकता विकास कार्यक्रम(EDP)
▪️उद्योजकता विकास कार्यक्रम (AMRUT EDP)
▪️ अमृत ग्राहक सेवा केंद्र प्रशिक्षण
▪️किशोर विकास उपक्रम -अमृत वर्ग
▪️अमृत कलश योजना (सॉफ्ट स्किल्स) ▪️अमृत मानसमित्र ▪️अमृत पर्यटन ▪️अमृत संवाद सेतू उपक्रम ▪️अमृत कुटुंब संवाद उपक्रम ✨अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या जिल्हा कार्यालय येथे संपर्क करावा. अमृत संस्थेचे संकेतिक स्थळ :- www.mahaamrut.org.in संपर्क क्रमांक :-9730151450
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment