स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती घडवूया ..

माझिया मना- लेख-क्रमांक २

स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती घडवूया .. मुख्य फोटो
मुख्य फोटो

आज आपण जे आहोत ते आपल्या भूतकाळात घडलेल्या काही गोष्टींमुळे किंवा आपल्याला आलेल्या अनुभवांमुळे आहोत, पण आपण जे होऊ शकतो ते मात्र आपल्या आजच्या आणि इथून पुढच्या विचारांवर अवलंबून आहे. आपण अनेकदा इतरांकडे पाहून विचार करतो की, "तो किती यशस्वी आहे!", "ती किती आत्मविश्वासाने बोलते!", "त्यांचा व्यवसाय किती चांगला चालतो!", "त्यांचे आयुष्य किती व्यवस्थित आहे!" पण या तुलनेच्या प्रवासात एक महत्त्वाची गोष्ट आपण विसरून जातो, ती म्हणजे आपण

आपल्या उत्तम आवृत्ती घडवण्याच्या प्रवासात सध्या कुठे आहोत? स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती घडवणे म्हणजे दुसऱ्यासारखे वागणे नाही. ते म्हणजे आपली क्षमता, गुण, अनुभव आणि मूल्ये ओळखून स्वतःची अधिक चांगली, सक्षम आणि आनंदी आवृत्ती घडवणे आहे.

आपण स्वतःला एक प्रश्न विचारू शकतो, आपण खरोखर स्वतःला ओळखतो का? एका गृहिणीला वाटत असते की ती फक्त घर सांभाळते. पण ती दररोज व्यवस्थापन, नियोजन, समस्या सोडवणे, आर्थिक संतुलन आणि नातेसंबंध जपण्याचे काम करत असते. कर्मचाऱ्याला वाटते की तो फक्त आपले काम करतो. पण तो जबाबदारी, शिस्त आणि वेळेचे व्यवस्थापन करत असतो. उद्योजकाला वाटते की अजून खूप काही मिळवायचे आहे. पण तो दररोज धैर्य, निर्णयक्षमता आणि संकटांशी सामना करण्याची ताकद विकसित करत असतो. खरं तर आपली सर्वोत्तम आवृत्ती ह्यातूनच घडणार असते.

आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया, "माझ्यात असे कोणते गुण आहेत, ज्यांची मला कदाचित अजून पूर्ण जाणीव झाली नाहीये?" अनेकदा आपल्याकडे असलेली ताकद आणि कौशल्ये आपण गृहीत धरतो आणि नसलेल्या गोष्टींवरच लक्ष केंद्रित करतो. सर्वोत्तम आवृत्ती घडवणं सोप्पं नाही आणि फार अवघडही नाही. त्याला फक्त स्वबोध म्हणजेच स्वतःची ओळख आणि सातत्य या दोन गोष्टींची गरज असते. स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती घडवण्यासाठीचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे 'स्वीकार'.

स्वतःला बदलण्याची सुरुवात स्वतःचा स्वीकार करण्यापासून होते. आपल्यात काही ताकद आहेत, काही मर्यादा आहेत, काही चुका आहेत आणि काही गोष्टी सुधाराव्या लागणार आहेत, हे मान्य करणे म्हणजे हार मानणे नाही; तर सुधारण्याचा पाया तयार करणे आहे. दररोज फक्त १% सुधारणा करण्याचा प्रयत्न करा आणि विचारांमधला फरक अनुभवा.

स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती घडवणे हे एक दिवसाचे काम नाही, तर तो आयुष्यभराचा सुंदर प्रवास आहे. या प्रवासात घाई करू नका. स्वतःवर कठोर होऊ नका. प्रत्येक लहान प्रगतीचा आनंद घ्या. 'उद्याची मी मला कशी दिसायला हवी आहे?' आणि 'आजच्या पेक्षा मी उद्या काय वेगळं आणि छान करू शकते?' याच प्रश्नांची उत्तरे शोधत राहिलात, तर यश, समाधान आणि आनंद हे तुमच्या प्रवासाचे सहप्रवासी बनतील. स्वतःला ओळखण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की तुम्हाला स्वतःची संगत आवडायला लागेल, तुमचा आत्मविश्वास वाढेल, आलेले संकट खूप मोठे वाटणार नाही आणि त्यातून लगेचच मार्ग सापडेल, कारण हा विचार करण्यासाठी तुमचे मन तुमची साथ देत असेल.

अशाच क्लिष्ट आणि अवघड वाटणाऱ्या गोष्टी सोप्या करण्यासाठी 'अमृत मानस मित्र'ची स्थापना झाली आहे. हा एक असा ऑनलाइन मित्र आहे ज्याला तुम्ही तुमच्या सर्व अडचणी विचारू शकता, त्याच्याशी बोलू शकता आणि समुपदेशकांना भेटू शकता. तुमचे शिक्षण मानसशास्त्र किंवा समुपदेशन या विषयात झाले असेल, तर तुम्ही 'मानस मित्र' होण्यासाठी प्रशिक्षणही घेऊ शकता. आता तुम्ही एकटे नाही आहात. मानस मित्र तुमच्या सोबत सदैव आहे.

— डॉ. मीताली मोरे

औद्योगिक मानसशास्त्रज्ञ आणि करिअर मार्गदर्शक

अमृत मानस मित्र समिती सदस्य.

"मन समृद्ध, जीवन समृद्ध."

-क्रमशः

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 26-06-2026 News publication date | Time: 11:33 AM News publication time | Views: 180 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 26-06-2026 News publication date | Time: 11:33 AM News publication time | Views: 180 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement