आज निर्जला एकादशीनिमित्त पुरातन मंदिरे आणि त्यांच्या रचनेमागचे विज्ञान जाणून घेऊया,या लेखातून!
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते.
देवळे म्हणजे जणू काही ब्रह्मांडाचा/भोवतालचा पंचमहाभूतांसह असलेला छोटासा तुकडाच जणू.
सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ ऊर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज व चुंबकीय ऊर्जेचे उत्तम वाहक (good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकीय वैश्विक ऊर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भोवती रेडिएट करणे हा तांब्याचा तुकडा मूर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश आहे.
त्यानंतर विधीपूर्वक मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवती मंदिर बांधले जाई.
आता देवळात जाताना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही १००% विज्ञान कसे आहे ते पाहू.
१) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो...
ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स (positive & pure vibrations) दुषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्यभागातील फरशी अशी निवडलेली असते (उदा. संगमरवर) की ती मंदिरातील शुभ ऊर्जेची उत्तम वाहक असेलच, पण आपण जेव्हा तिच्यावरून अनवाणी (bare footed) चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पॉइंट्स मधून ती आपल्या शरीरात प्रवेश करेल.
जर तुमची पंच ज्ञानेन्द्रिये receiving mode मध्ये असतील तरच मंदिरातील शुभ ऊर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेऊ शकाल, तेव्हा पुढचे नियम त्यासाठी...
२) मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वाराशी असलेली घंटा वाजवणे...
ह्यामागेही दोन उद्देश आहेत. पहिला म्हणजे, ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाजविल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद राहणारा प्रतिध्वनित नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच, पण आपला उजवा व डावा मेंदू समन्वयाने (co-ordination) काम करू लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मक विचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.
३) आपले पाच senses म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वास घेणे. यापुढील रुढी हे पाच सेन्सेस जागृत करतात.
अ. कापूर जाळणे -- दृष्टी
ब. कापूर आरतीवर हात फिरवून ते डोळ्यांना लावणे... स्पर्श
क. मूर्तीवर फुले वाहणे... फुलांच्या अरोमामुळे वास.
ख. कापूर व तुळशीपत्र घातलेले तीर्थ प्राशन करणे... चव.
हे तीर्थ तांब्याच्या/चांदीच्या भांड्यात ८ तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ-ताप असे आजारही जातात.
ड. घंटानाद व मंत्रोच्चार... ऐकणे.
अशाप्रकारे जागृत अवस्थेत व receiving mode मध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ ऊर्जा स्वतःत सामावून घ्यायची असते.
मूर्तीच्या मागील बाजूस व भोवती पसरलेली ऊर्जाही मिळावी म्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन...
पूर्वज म्हणतात, हे सगळे केल्यावर पटकन गजबजत जाऊ नका. मंदिरात जरा वेळ टेका. शरीरात ऊर्जेला समावायला, settle व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने, आनंदाने, ऊर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा.
धार्मिक कारणांसाठी उपवास करणे ही भारतीयांची श्रद्धा आहे, प्रथा आहे. महाराष्ट्रात आषाढी आणि कार्तिकी एकादशी, चतुर्थी, महाशिवरात्र यासारख्या निमित्ताने उपवास धरला जातो.
कित्येकजण आराध्य देवतेनुसार आठवड्यातून एकदा सोमवार, गुरुवार किंवा शनिवार या दिवशी असे वर्षभरही उपवास करीत असतात. रोजच्या जेवणातील पदार्थापेक्षा वेगळ्या वस्तूंपासून बनविलेले पदार्थ उपवासाच्या दिवशी आवडीने खाल्ले जातात. उपवासाचा मूळ हेतू – पोटाला विश्रांती देणे – दूरच राहून ‘एकादशी दुप्पट खाशी’ अशी वस्तुस्थिती असते. उपवासाचे पदार्थच तितके चविष्ट असतात हे त्यामागचे खरे कारण, त्यामुळे उपवास नसतानासुद्धा साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा यासारखे पदार्थ हल्ली हॉटेलांमधूनही खूप लोकप्रिय झालेले आहेत.
आज निर्जला एकादशीनिमित्त आपल्या स्थापत्यशास्त्राचे वैशिष्ट्य समजावे यासाठीच या लेखाचे प्रयोजन आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांचा असा अनोखा संगम असणारी भारतीय संस्कृती कदाचित जगातील एकमेव अस्तित्वात असणारी संस्कृती असेल. आपले देव, मंदिरे, पूजा-अर्चा हे केवळ धार्मिक विधी नाहीत, तर त्यामागे विज्ञान आहे, जे आता संशोधनातून सिद्ध होत आहे; ते कैक वर्षांपूर्वीपासूनच आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग होते, याचाच मंदिरे आणि व्रते हे पुरावा आहेत. पुढच्या पिढीपर्यंत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी, त्यांना याची जाणीव करून देण्यासाठी आपणच आपल्या संस्कृतीचे दूत होऊया आणि आपल्या या महान भारतीय संस्कृतीला पुनरुज्जीवित करूया!
-संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment