अमृतचा हात, उद्योजकतेला बळ - किरण वकील यांची यशोगाथा

महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या राज्य शासनाच्या संस्थेमुळे किरण प्रकाशराव वकील यांची उद्योजकीय वाटचाल अधिक बळकट झाली आहे.

अमृतचा हात, उद्योजकतेला बळ - किरण  वकील यांची यशोगाथा मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या राज्य शासनाच्या संस्थेमुळे किरण प्रकाशराव वकील यांची उद्योजकीय वाटचाल अधिक बळकट झाली आहे. त्यांना आतापर्यंत तब्बल ₹४३,०४१ इतका वैयक्तिक कर्जावरील व्याज परतावा मिळाला असून, यामुळे त्यांच्या व्यवसायाला नवी उभारी मिळाली आहे. किरण वकील यांनी गहू, चणा आणि सोयाबीन फिल्टर करण्यासाठी आधुनिक मशीन खरेदी करून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. आज ते केवळ स्वतःचा गहू पॅकेजिंग करून विकत नाहीत, तर परिसरातील शेतकऱ्यांनाही धान्य फिल्टर करून देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य आणि अधिक चांगला दर मिळत आहे. स्वतः उभे राहून इतरांनाही उभे करण्याची ही प्रेरणादायी कथा आहे! अमृतच्या व्याज परतावा योजनेमुळे मिळालेल्या आर्थिक आधारामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यांनी अमृत संस्थेच्या संशोधन अधिकारी सुमेधाताई देशपांडे तसेच जिल्हा व्यवस्थापक ऋषिकेश पंडितराव खराटे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. अधिक माहितीसाठी संपर्क: अमृत वर्धा जिल्हा कार्यालय, प्रशासकीय भवन, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, सिव्हिल लाईन, वर्धा मोबाईल: 9112227632


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना शासकीय संस्था, आयोग किंवा महामंडळ यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Rushikesh Kharate News publisher name | Date: 22-06-2026 News publication date | Time: 02:05 PM News publication time | Views: 160 Number of times this news has been viewed | District: Wardha Related district of the news
Publisher: Rushikesh Kharate News publisher name | Date: 22-06-2026 News publication date | Time: 02:05 PM News publication time | Views: 160 Number of times this news has been viewed | District: Wardha Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement