अमृतच्या मुख्य कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमातून स्वयंरोजगारासाठी मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहेत.
दिनांक १७ जून २०२६ रोजी अमृत मानसमित्र समुपदेशन प्रशिक्षण कार्यक्रमाचे अमृतचे मुख्य कार्यालय(पुणे) येथे उद्घाटन संपन्न झाले. हे उद्घाटन मा. व्यवस्थापकीय संचालक , अमृत यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी अमृतचे मा. राज्य व्यवस्थापक , मा. विभागीय व्यवस्थापक, मा. जिल्हा व्यवस्थापक व संस्थेचे इतर कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH), पुणे च्या वतीने श्री. कापसे सर, डॉ. आनंद गोडसे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. या प्रशिक्षण समितीत गीता जोशी, कार्तिकी सुबकने, रिद्धी दोशी व इतर यांचा समावेश आहे. मार्गदर्शन सत्रात डॉ. आनंद गोडसे यांनी मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करण्याचं महत्त्व व काळाची गरज पटवून सांगितली.
तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाईन समन्वय साधण्यासाठी कु. ऋज्वी मेंगाने ह्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने स्वयं प्रेरणेने हा चॅटबॉट विकसित केला आहे.
हे प्रशिक्षण अमृत व महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH) यांच्या वतीने खुल्या प्रवर्गातील लक्षित गटातील विद्यार्थांसाठी मोफत असेल . प्रशिक्षणाचे एकूण स्वरूप ६ महिन्याचे असून, १५ दिवसांचे निवासी शिबिर पुण्यात राबविण्यात येईल. त्यानंतर प्रशिक्षणार्थी १ महिना निरीक्षणाधारित प्रत्यक्ष कार्याचे अनुभव घेईल. त्यानंतर ३ महिन्याचे मार्गदर्शन व पर्यवेक्षण संस्थेमार्फत केले जाईल. अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांना ‘प्रथम येईल त्याच प्राधान्य’ या तत्त्वावर या प्रशिक्षणासाठी प्रवेश दिल्या जाईल.
हे प्रशिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता असलेले अमृतच्या लक्षित गटातील उमेदवार अर्ज करू शकतात :
* एम.ए./एम. एस्सी. (मानसशास्त्र, समुपदेशन मानसशास्त्र)
*मास्टर ऑफ सोशल वर्क. प्रशिक्षण घेतल्यावर विद्यार्थ्यांना ताणतणाव, भावनिक समस्या, डिजिटल व्यसन आणि करिअरविषयक संभ्रम यांसारख्या अनेक समस्यांवर प्रभावी मार्गदर्शन व योग्य सहाय्य प्रशिक्षणांमार्फत शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची भूमिका बजावेल व समाज कार्यात ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरेल .
प्रशिक्षणामध्ये या बाबींचा असेल समावेश:
१) विद्यार्थी समुपदेशनाची मूलतत्त्वे २) बाल व किशोर मानसिक आरोग्य ३) संवाद कौशल्ये व सक्रिय श्रवण ४) तणाव व्यवस्थापन व भावनिक स्वास्थ्य ५) जीवनकौशल्य शिक्षण ६) आत्महत्या प्रतिबंध आणि संकट व्यवस्थापन ७) सायबर सुरक्षा व डिजिटल आरोग्य ८) पालक व शिक्षकांसोबत समन्वय ९) मानसिक आरोग्य जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन १०) शाळा आधारित समुपदेशन व रेफरल प्रणाली
प्रशिक्षणानंतर उपलब्ध होणाऱ्या संधी: प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना "अमृत मानसमित्र समुपदेशक" हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. खालील क्षेत्रांमध्ये कार्य करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते :
● शाळा व महाविद्यालयीन समुपदेशक किंवा विद्यार्थी कल्याण अधिकारी
● अमृत मानसमित्र समुपदेशक
● जीवनकौशल्य प्रशिक्षक
● मानसिक आरोग्य जनजागृती प्रशिक्षक
● पालक व शिक्षक कार्यशाळा समन्वयक
● स्वयंरोजगाराच्या माध्यमातून समुपदेशन सेवा व जीवनकौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रशिक्षक.
पात्रता :- अमृत लक्षित गट (ब्राह्मण, बनिया, कोमटी – आर्य/वैश्य, सिंधी, मारवाडी, गुजराती, पटेल, पाटीदार, राजपूत , राजपुरोहित, कायस्थ, नायर, नायडू, बंगाली, त्यागी, जाट, कम्मा, कानबी, अय्यंगार, बेलमार, सेनगुण्यार, लोहाना, भूमीहार, हिंदू नेपाळी) ह्या जातीतील विद्यार्थी युवक व युवती अमृत संस्थे च्या योजनांचा लाभ घेण्यास पात्र आहे.
पहिल्या बॅच साठी अर्जाची मुदत
अमृत मानस मित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पहिल्या बॅच साठी ऑनलाईन अर्ज १५ जून ते २२ जून २०२६ या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज करता येईल. छाननीअंती पात्र झालेल्या उमेदवारांना ईमेल/ मेसेज द्वारे कळविण्यात येईल. मुदतीत प्रवेश न घेतल्यास प्रतीक्षा यादीतील अन्य उमेदवारांना संधी दिल्या जाईल. हया प्रशिक्षणात नोंदणी करण्यासाठी दस्तावेज अमृत च्या जिल्हा कार्यालयास सादर करणे बंधनकारक असेल.
अधिक माहितीकरिता अमृत संस्थेच्या www.mahaamrut.org.in या अधिकृत वेबसाईट वर भेट द्या.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment