अष्टागारातील पाऊस, जटायू गोसावी आणि रामेश्वराच्या देवळातील अनुष्ठान

अष्टागारात पाऊस पडला नाही तर चौलचे ग्रामदैवत असलेल्या रामेश्वर मंदिरात अनुष्ठान करण्याची परंपरा पुरातन आहे.

इ.स. १७७९ या वर्षीही अष्टागारात अवर्षणाचे संकट उभे राहिले. या वर्षी मघा नक्षत्रापर्यंत पाऊस पडला नव्हता; म्हणून प्रांतातील अनेक देवालयात अनुष्ठाने करण्यास सुरुवात झाली. त्याप्रमाणे श्री रामेश्वराच्या मंदिरातही श्रावण शुद्ध षष्ठी, मंगळवारी श्रींचा गाभारा पाण्याने भरण्यात आला आणि अनुष्ठानाला सुरुवात झाली.

अष्टागारातील पाऊस, जटायू गोसावी आणि रामेश्वराच्या देवळातील अनुष्ठान मुख्य फोटो
अष्टागारातील पाऊस, जटायू गोसावी आणि रामेश्वराच्या देवळातील अनुष्ठान अतिरिक्त फोटो

या अनुष्ठानाप्रसंगी एक घटना घडली तिची नोंद घेणे गरजेचे आहे, कारण पाऊस न पडण्याचे एक कारण म्हणजे प्रांतात न्यायदान नीट होत नाही, अशीही एक समजूत किंवा कारण या घटनेमुळे आपल्याला समजते. अर्थातच याला काकतालीय न्याय असेच म्हणावे लागेल. ती घटना म्हणजे, रामेश्वराच्या ओवरीतील विठोबाच्या मंदिरात जटायू गोसावी हा चार-पाच वर्षांपासून राहत होता. तो भिक्षा मागावयास गावात जात असे. अनुष्ठानाच्या दिवशी तो भिक्षा मागावयास गेला, तेव्हा कोलवडीतील लोकांजवळ म्हणू लागला कि, "अंमलदार माझी दाद देत नाही म्हणून पाऊस पडत नाही" जटायू गोसावी आणि माहादाजी दादाजी देसाई यांचे देवालयाच्या जागेविषयी भांडण होते. त्याची तक्रार जटायू गोसाव्याने महालात केली होती, परंतु अंमलदाराने त्याबद्दल दाद दिली नव्हती. म्हणून जटायू गोसावी जमलेल्या लोकांसमोर म्हणू लागला की, "माझी दाद दिली नाही, देत नाही म्हणून पाऊस पडत नाही." ही बातमी अंमलदार हरजी आंबरे यांस कळली तेव्हा त्यांनी जटायू गोसाव्याला बोलावून रामेश्वरी नेले, तेथल्या पिंपळाच्या पारावर बसवले. कोलवडीतील तीन-चारशे लोकही रामेश्वरी आले आणि ते जटायू गोसाव्यास म्हणू लागले, "गोसावी बाबा, तुम्ही गावात जे म्हणालात त्याची दाद देतो, परंतु पर्जन्य पडेल, पडावे, यैसे करावे." यावर जटायू गोसावी म्हणाला, "माझी व देसाई यांची कजियाविषयी (भांडणाविषयी) दाद द्याल यैसी भाश द्यावी म्हणजे आजच्या रात्री पर्जन्य पडेल." तेव्हा गोविंदराम परांजपे यांनी भाश दिली. ती भाश घेऊन गोसावी विठोबाच्या देवळात गेला. दुसऱ्या दिवशी आसनावर बसून डोके भूमीवर ठेवून राहिला तो तसाच होता. रात्री त्याला देवाळाच्या पडवीत उचलून नेले, तेथेच तो मृत्यू पावला. याच दिवशी श्रींजवळ अनुष्ठानास प्रारंभ झाला.
ब्राह्मण समाज चौल आयोजित विशेष संततधार कार्यक्रम संस्थेचे ज्येष्ठ सभासद माजी सचिव श्री श्री निवास गो. केळकर यांच्या पौराहित्याने व संस्थेचे माजी अध्यक्ष श्री प्रकाश जोगळेकर .. विद्यमान सचिव श्री संकेत जोशी यांच्या उपस्थितीत सकाळी ठीक सहा वा. सुरवात झाली.अध्यक्ष म्हणूनआपल्या संस्थेला लाभलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री नृपेन विध्वंस व सहकारी ग्रामस्थ
यांच्या उपस्थितीत संततधार (अखंड रुद्राभिषेक) सोहळा श्री देव रामेश्वर चौल येथे संपन्न झाला.
अलिबाग तालुक्यातील चौल अष्टांगरांमधे असे विविध उपक्रम सुरू असतात.

Publisher: Shailesh VINAYAK Marathe News publisher name | Date: 21-06-2026 News publication date | Time: 11:42 AM News publication time | Views: 26 Number of times this news has been viewed | District: raigad Related district of the news
Publisher: Shailesh VINAYAK Marathe News publisher name | Date: 21-06-2026 News publication date | Time: 11:42 AM News publication time | Views: 26 Number of times this news has been viewed | District: raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement