अहिल्यानगरच्या यशची भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी निवड - राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सत्कार

अहिल्यानगरच्या यश आंबेकरची भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी निवड राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

अहिल्यानगरच्या यशची भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी निवड - राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सत्कार मुख्य फोटो
मुख्य फोटो

२२ जून २०२६

ऑल इंडिया ५९ वी रँक मिळवत अहिल्यानगरचे सुपुत्र यश आंबेकरची भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी निवड ! राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सत्कार अहिल्यानगर येथील रहिवासी व माजी नौसेना अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर यांचे सुपुत्र यश आंबेकर यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर अत्यंत मानाची नियुक्ती झाली आहे. देहरादून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये १३ जून २०२६ रोजी झालेल्या एका विशेष दीक्षांत समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. यश यांनी जुलै २०२२ मधील इंडियन आर्मी टेक्निकल एंट्री स्कीम परीक्षेत ऑल इंडिया ५९ वी रँक मिळवली होती. त्यानंतर त्यांनी गया येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये एक वर्ष आणि पुणे येथील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग संस्थेत तीन वर्षे असे एकूण चार वर्षांचे खडतर तांत्रिक सैन्य प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यांच्या या गौरवास्पद यशामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव देशात अतिशय अभिमानाने उंचावले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावेत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक : 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 20-06-2026 News publication date | Time: 06:08 PM News publication time | Views: 83 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 20-06-2026 News publication date | Time: 06:08 PM News publication time | Views: 83 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement