जळगाव येथील भगवान परशुराम तीर्थक्षेत्र माहिती अभियान

भगवान श्री परशुराम यांच्या भारतभर विखुरलेल्या पवित्र तीर्थक्षेत्रांची मिळाली माहिती

जळगाव येथील भगवान परशुराम तीर्थक्षेत्र माहिती अभियान मुख्य फोटो
जळगाव येथील भगवान परशुराम तीर्थक्षेत्र माहिती अभियान अतिरिक्त फोटो

जळगाव जिल्हा (राजेंद्र कानडे यांनी)

भगवान श्री परशुराम यांच्या भारतभर विखुरलेल्या पवित्र तीर्थक्षेत्रांची माहिती सर्व समाज बांधव तसेच संपूर्ण हिंदू समाजापर्यंत पोहोचवण्याचा विशेष उपक्रम उत्तर भारतीय ब्राह्मण संस्थेतर्फे हाती घेण्यात आला आहे. महिनाभर चालणाऱ्या या अभियानाची सुरुवात ८ जून पासून करण्यात आली आहे. यात भगवान परशुराम यांच्याशी संबंधित विविध प्राचीन तीर्थक्षेत्रांचा इतिहास, धार्मिक महत्त्व, सांस्कृतिक वारसा तसेच त्या स्थळांची वैशिष्ट्यपूर्ण माहिती समाज माध्यम समूहाद्वारे सादर करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष मोहन तिवारी यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अभियानाच्या प्रारंभी प्रसिद्ध करण्यात आलेल्या दोन माहिती पत्रांमध्ये उडुपी (दक्षिण भारत) परिसरातील पवित्र परशु तीर्थ तसेच कोकणातील चिपळूण येथे वसलेल्या ऐतिहासिक भगवान परशुराम मंदिराची माहिती देण्यात आली आहे. यापुढेही देशातील विविध परशुराम तीर्थक्षेत्रांची माहिती क्रमशः प्रसारित करण्यात येणार आहे. अमृत संस्थेच्या विविध उपक्रम आणि योजनांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असतो.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 13-06-2026 News publication date | Time: 02:15 PM News publication time | Views: 25 Number of times this news has been viewed | District: Jalgaon Related district of the news
Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 13-06-2026 News publication date | Time: 02:15 PM News publication time | Views: 25 Number of times this news has been viewed | District: Jalgaon Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement