अमृत संस्थेच्या प्रशिक्षणातून प्राप्त झालेले ज्ञान, व्यवसाय नियोजन आणि उद्योजकीय मार्गदर्शनाच्या आधारे स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारत यशस्वी उद्योग उभा केला आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेत स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या रत्नपारखी दाम्पत्याची ही यशोगाथा
जालना : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या उद्योग कौशल्य वर्धन प्रशिक्षण (EDP) तसेच आयात-निर्यात प्रशिक्षणाचा लाभ घेऊन सौ. वैशाली रत्नपारखी व श्री. पुष्कर रत्नपारखी यांनी वेजिटेबल डीहायड्रेशन क्षेत्रात यशस्वी उद्योग उभारला आहे. “पितृअंबर प्रॉडक्ट्स” या नावाने त्यांची उत्पादने बाजारात उपलब्ध असून गुणवत्तापूर्ण उत्पादन, आकर्षक पॅकेजिंग आणि प्रभावी विपणनाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अमृत संस्थेच्या प्रशिक्षणातून प्राप्त झालेले ज्ञान, व्यवसाय नियोजन आणि उद्योजकीय मार्गदर्शनाच्या आधारे रत्नपारखी दाम्पत्याने स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारत यशस्वी उद्योग उभा केला आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेत त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून रोजगार निर्मितीलाही हातभार लावला आहे.
या यशस्वी उद्योगास अमृत संस्थेचे मा. राज्य व्यवस्थापक श्री. दीपकजी जोशी, विभागीय व्यवस्थापक श्री. अमित सामंत, विभागीय उपव्यवस्थापक श्री. ओंकार शेटे तसेच जिल्हा व्यवस्थापक श्री. नितीन खेकाळे यांनी भेट दिली. यावेळी मान्यवरांनी उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, पॅकेजिंग व विपणन व्यवस्थेची माहिती घेत व्यवसायातील विविध पैलू जाणून घेतले.
मान्यवरांनी रत्नपारखी दाम्पत्याच्या उद्योजकीय प्रयत्नांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच उद्योग विस्तार, बाजारपेठ वाढवणे आणि भविष्यात उपलब्ध होणाऱ्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. अमृत संस्थेच्या प्रशिक्षणाचा योग्य उपयोग करून उभारलेला हा उद्योग इतर युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. या दाम्पत्याप्रमाणेच अनेकांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वयंरोजगाराच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकावे, असे आवाहन अमृत संस्थेद्वारे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अमृतच्या वेबसाईटला किंवा त्या त्या जिल्ह्यातील अमृत कार्यालयाला भेट द्यावी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment