नांदेड येथील स्नेहल देशपांडे या विद्यार्थिनीला अमृत संस्थेच्या शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ₹६०,००० चे आर्थिक सहाय्य प्राप्त झाले. सध्या त्या IIM Tiruchirappalli येथे एमबीएचे शिक्षण घेत आहेत. अर्थसहाय्य मिळाल्यानंतर त्यांनी अमृत नांदेड कार्यालयाला भेट देऊन जिल्हा व्यवस्थापक सुरभ कुलकर्णी व सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आभार मानले. या मदतीमुळे उच्च शिक्षणाला मोठा आधार मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या अमृत संस्थेच्या शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेत नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थिनी स्नेहल देशपांडे यांना ₹६०,००० चे अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे. स्नेहल देशपांडे या सध्या Indian Institute of Management Tiruchirappalli येथे एमबीएचे शिक्षण घेत आहेत. मागील वर्षी त्यांनी नांदेड जिल्ह्यातून या योजनेसाठी अर्ज केला होता. अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात ₹६०,००० ची रक्कम जमा झाली. या आर्थिक मदतीमुळे त्यांच्या उच्च शिक्षणाला मोठा आधार मिळाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. योजनेचा लाभ मिळाल्यानंतर स्नेहल देशपांडे यांनी नांदेड जिल्हा अमृत कार्यालयाला भेट देऊन जिल्हा व्यवस्थापक सौरभ कुलकर्णी सर तसेच अमृत संस्थेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार मानले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संस्था करत असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी बोलताना स्नेहल देशपांडे यांनी सांगितले की, “अमृत संस्थेच्या शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेमुळे मला उच्च शिक्षणासाठी महत्त्वाची आर्थिक मदत मिळाली.”
अमृतच्या लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांनी अमृतच्या विविध शैक्षणिक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी अमृत टीमतर्फे करण्यात आले.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment