महिलांसाठी आरोग्य आणि संस्कार संवर्धन कार्यक्रम

विश्व हिंदू परिषदेतर्फे डोंबिवलीत दर बुधवारी आयोजन

महिलांसाठी आरोग्य आणि संस्कार संवर्धन कार्यक्रम मुख्य फोटो
महिलांसाठी आरोग्य आणि संस्कार संवर्धन कार्यक्रम अतिरिक्त फोटो

डोंबिवली : विश्व हिंदू परिषदेच्या वतीने डोंबिवली पूर्व येथील साईबाबा मंदिर-नेहरू मैदान येथे महिलांसाठी योग आणि संस्कार वर्ग हा उपक्रम राबवला जात आहे. महिलांच्या शारीरिक, मानसिक आणि सांस्कृतिक विकासाच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दर बुधवारी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत हा वर्ग विनामूल्य आयोजित करण्यात येत आहे. यात महिलांना योगाभ्यास, आरोग्यदायी जीवनशैली, तसेच भारतीय संस्कारांचे मार्गदर्शन केले जात आहे. 

या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी नगरसेविका रंजना पेणकर यांनी उपस्थित पाहून मार्गदर्शन केले. विश्व हिंदू परिषदेचे कल्याण जिल्हा अध्यक्ष अजित तायडे, कल्याण जिल्हा धर्म प्रसार आयामाचे संपर्क प्रमुख सतीश महानूर, मातृशक्ती कल्याण विभाग संयोजिका राधिका भावसार, कल्याण जिल्हा संपर्क विभागाचे प्रमुख कार्यकर्ते सुनील पाटील, संदीप पैठणकर, ऊर्जिता जोशी, सुषमा आपटे, माधवी दामले आणि विश्व हिंदू परिषद कार्यकर्ता परिवाराच्या सक्रिय सहभागातून हा कार्यक्रम उत्तम पद्धतीने पार पडला. 

या वेळी उपस्थित महिलांना अमृत संस्थेच्या विविध योजना आणि अमृत वर्ग याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. त्यांनी आयोजित केलेल्या संस्कार वर्गामध्ये अमृत वर्ग घेण्याचेही सुचवण्यात आले.

Publisher: माया रत्नपारखी -खेत्रे News publisher name | Date: 22-05-2026 News publication date | Time: 05:48 PM News publication time | Views: 233 Number of times this news has been viewed | District: Thane Related district of the news
Publisher: माया रत्नपारखी -खेत्रे News publisher name | Date: 22-05-2026 News publication date | Time: 05:48 PM News publication time | Views: 233 Number of times this news has been viewed | District: Thane Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement