दक्षिण काशी वाई येथे २२ मेपासून लघू कुंभमेळा

देशभरातील साधू-संत, नागा संन्यासी, भाविक आणि पर्यटक राहणार उपस्थित

दक्षिण काशी वाई येथे २२ मेपासून लघू कुंभमेळा मुख्य फोटो
मुख्य फोटो

वाई : लघू कुंभमेळ्याच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील वाईनगरी धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक वातावरणाने भारावून जाणार आहे. वाई येथील सेवा उत्सव समिती, तसेच श्री शंभू पंचायती अटल आखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारत गुरू पंचायती योगी नागा क्षेत्रीय लघू कुंभमेळा २०२६चे आयोजन येथे करण्यात आले आहे.

हा भव्य धार्मिक सोहळा गणपती घाट तीर्थक्षेत्र येथे २२ मे ते २५ मे २०२६ या कालावधीत पार पडणार असून, राज्यासह देशभरातील साधू-संत, नागा संन्यासी, भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई शहरात आयोजित करण्यात आलेल्या या लघू कुंभमेळ्यात विविध धार्मिक विधी, संत प्रवचने, भजन-कीर्तन, आध्यात्मिक कार्यक्रम, तसेच नागा साधूंच्या दर्शनाचा लाभ भक्तांना घेता येणार मिळणार आहे. या सोहळ्यामुळे वाई शहराच्या धार्मिक महत्त्वाला व पर्यटन वैभवाला अधिक चालना मिळणार असून, प्रशासन व आयोजक समितीकडून भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

Publisher: अविनाश कुलकर्णी News publisher name | Date: 21-05-2026 News publication date | Time: 09:09 AM News publication time | Views: 537 Number of times this news has been viewed | District: Satara Related district of the news
Publisher: अविनाश कुलकर्णी News publisher name | Date: 21-05-2026 News publication date | Time: 09:09 AM News publication time | Views: 537 Number of times this news has been viewed | District: Satara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement