गुरुपौर्णिमेला होते भक्तगणांची गर्दी
जळगाव जिल्ह्याचा यावल तालुका केळी पिकाने बहरलेला आहे. याच यावल गावात व्यासांचे एक मोठे मंदिर आहे. आपल्या सनातन धर्मामध्ये गुरू-शिष्याचे नाते फार प्रसिद्ध आहे. पुरातन काळापासून गुरू-शिष्य ही परंपरा चालू आहे. पूर्वी गुरुकुल पद्धती असायची व त्या ठिकाणी शिकणारा शिष्य साधारणतः आपला शिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर गुरूंना यथाशक्ती दक्षिणा देऊन जात असे.
व्यासांनी महाभारत लिहिले. त्यामुळे त्यांना गुरू मानून आपल्या मनोकामना सांगण्यासाठी यावलमधील व्यासमंदिरात भक्त येतात. व्यासांचे हे भव्य मंदिर असून या ठिकाणी अनेक राज्यांतील भक्तगण येतात. त्यामध्ये आबालवृद्धांचा समावेश असतो.ज्यांना गुरू नाही किंवा ज्यांनी गुरू केलेला नाही ते अनेक राज्यांतील भक्तगण व्यासपौर्णिमा/गुरुपौर्णिमेच्या वेळी या व्यास मंदिरात दर वर्षी न चुकता येऊन व्यासांचे दर्शन घेतात. देशात व्यासांचे हे एकच प्रसिद्ध मंदिर असल्याचे सांगितले जाते.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment