नवसाला पावणारा शिरसाळ्याचा मारुतीराया

जळगाव जिल्ह्यातील एक अनोखे श्रद्धास्थान

नवसाला पावणारा शिरसाळ्याचा मारुतीराया मुख्य फोटो
मुख्य फोटो

जळगाव जिल्ह्याच्या बोदवड तालुक्यातील शिरसाळा हे दीड हजार लोकसंख्येचे सीमावर्ती असलेले गाव आहे. याच्या बाजूलाच विदर्भाची सीमा, तसेच मध्य प्रदेशाची प्रदेशाची सीमा लागते. या गावातील मारुतीच्या मंदिराची एक आख्यायिका सांगितली जाते. या मारुतीरायाच्या डोक्यावर कोणतेही छत नाही आणि कोणी छत टाकण्याचा प्रयत्न केल्यास ते मारुतीराया त्या ठिकाणी राहू देत नाही, असे सांगितले जाते. हा शिरसाळ्याचा नवसाला पावणारा मारुतीराया होय.

शिरसाळा गावात मराठा समाजाची लोकसंख्या अधिक असून, त्या खालोखाल इतर समाज असून, सर्व समाज या ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदत आहे. या गावातील मारुती प्रसिद्ध असून, अनेक राज्यांतील भक्त मंडळी आपला नवस सांगण्यासाठी येथे येतात आणि हा मारुतीराया नवसाला पावतो, अशी त्यांची श्रद्धा आहे.

या शिरसाळ्याच्या मारुतीरायाचे दर्शन अकरा वेळा घेतले, तर आपली मनातील मनोकामना पूर्ण होते, असे म्हटले जाते. त्यानंतर या ठिकाणी नवस फेडण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असतो. हा मारुतीराया उभ्या स्वरूपातील असून या मारुतीरायाच्या डोक्यावर कोणतेही छत नाही.

Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 20-05-2026 News publication date | Time: 05:12 PM News publication time | Views: 125 Number of times this news has been viewed | District: Jalgaon Related district of the news
Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 20-05-2026 News publication date | Time: 05:12 PM News publication time | Views: 125 Number of times this news has been viewed | District: Jalgaon Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement