अकोल्याच्या सूर्योदय बालगृहात उत्साहात पार पडले योगासन शिबीर

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सकारात्मकता आणि शिस्त यामध्ये झाली लक्षणीय वाढ

अकोल्याच्या सूर्योदय बालगृहात उत्साहात पार पडले योगासन शिबीर मुख्य फोटो
अकोल्याच्या सूर्योदय बालगृहात उत्साहात पार पडले योगासन शिबीर अतिरिक्त फोटो

अकोला : सूर्योदय बालगृहात अकोल्यातील प्रसिद्ध योग प्रशिक्षिका सौ. स्नेहा प्रवीण देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेले विशेष योगासन शिबीर नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. १५ एप्रिल ते पाच मे या कालावधीत झालेल्या या शिबिराला बालगृहातील विद्यार्थी, तसेच कर्मचारी वर्गाकडून चांगला प्रतिसाद लाभला.

या योगासन शिबिरामध्ये दररोज विविध योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा यांसह आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने योगासनांचे महत्त्व समजावून सांगून योगशिक्षिका स्नेहा देशपांडे यांनी सोप्या आणि प्रभावी पद्धतीने प्रशिक्षण दिले. शिबिरामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सकारात्मकता आणि शिस्त यामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले.

सकाळच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन विविध योगासनांचा सराव केला. ध्यान आणि प्राणायामामुळे विद्यार्थ्यांना मानसिक शांतता मिळाल्याचे त्यांनी सांगितले. योगासनांच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली कशी अंगीकारावी, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. सूर्योदय बाल गृहाच्या व्यवस्थापनाने या उपक्रमाचे कौतुक करून स्नेहा प्रवीण देशपांडे यांचे विशेष आभार मानले. अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले.

शिबिराच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांना उजाळा दिला आणि योगासनांमुळे दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल जाणवत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. या योगशिबिरामुळे बालगृहामध्ये आरोग्य, आनंद आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे योगशिक्षिका स्नेहा प्रवीण देशपांडे यांनी सांगितले.

Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 19-05-2026 News publication date | Time: 05:02 PM News publication time | Views: 268 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news
Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 19-05-2026 News publication date | Time: 05:02 PM News publication time | Views: 268 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

P
Pravin
19-05-2026 07:57 PM

👌👌👌👍👍छान उपक्रम

Write a Comment
0 / 50 words
Advertisement