जनगणनेसाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे

वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; १६ मे १४ जून या कालावधीत प्रगणक जाणार घरोघरी

जनगणनेसाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे मुख्य फोटो
मुख्य फोटो

वाशिम : जनगणना २०२७ मोहीम सुरू झाली असून, त्याअंतर्गत घर यादी व घरगणना प्रक्रिया यंदा डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाशिमचे जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

जनगणना प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणकांकडून नागरिकांची घर यादी व घरगणनेची आवश्यक नोंद करण्यात येणार आहे. १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत नियुक्त प्रगणक घरभेटी देऊन माहिती संकलित करणार आहेत. ज्या नागरिकांनी स्वगणना गणना केली आहे, त्यांनी एसई आयडी आलेल्या प्रगणकांना द्यायचा आहे. प्रगणक भरलेली माहिती तपासून सबमिट करतील.

या प्रक्रियेत शासनाने निर्धारित केलेल्या जनगणनेसंदर्भातील ३३ प्रश्नांची माहिती नागरिकांना प्रगणकांना द्यावी लागणार आहे. या माहितीच्या आधारे संबंधित नागरिकांची नोंद जनगणनेच्या एचएलओ ॲपवर करण्यात येणार आहे.

घरयादी व घरगणना प्रक्रियेत इमारत व घर क्रमांक, कुटुंबातील सदस्यांची संख्या, कुटुंबप्रमुखाचे नाव, लिंग व प्रवर्ग, राहण्याच्या खोल्यांची संख्या, विवाहित जोडप्यांची संख्या, उपलब्ध सुविधा, मालमत्ता, साहित्य आदी विविध बाबींची माहिती विचारली जाणार आहे. या सर्व माहितीच्या आधारे घरयादी व घरगणनेचे काम डिजिटल स्वरूपात पूर्ण करण्यात येईल. तसेच जनगणनेसंदर्भातील नागरिकांची माहिती पूर्णपणे गोपनीय व सुरक्षित ठेवली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात सक्रिय सहभाग नोंदवून १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत होणाऱ्या घरयादी व घरगणना प्रक्रियेसाठी नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षकांना आवश्यक माहिती देऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे. जिल्ह्यासाठी एकूण २१७४ घरगणना प्रभाग तयार करण्यात आले असून, या कामासाठी एक मास्टर ट्रेनर, ४२ फिल्ड ट्रेनर, २२१८ प्रगणक आणि ३७८ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 16-05-2026 News publication date | Time: 08:51 AM News publication time | Views: 327 Number of times this news has been viewed | District: Washim Related district of the news
Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 16-05-2026 News publication date | Time: 08:51 AM News publication time | Views: 327 Number of times this news has been viewed | District: Washim Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement