नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
यवतमाळ : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे परशुराम जन्मोत्सवानिमित्त यवतमाळमध्ये भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला आणि संपूर्ण परिसर धार्मिक वातावरणाने भारावून गेला होता. संध्याकाळी आयोजित करण्यात आलेली ही शोभायात्रा बाइक रॅलीच्या स्वरूपात काढण्यात आली. यवतमाळच्या सावरकर चौकातून प्रारंभ झालेली ही शोभायात्रा यवतमाळ शहरातील विविध मार्गांवरून मार्गक्रमण करून महिला विद्यालयाजवळ तिचा समारोप झाला. शोभायात्रेमध्ये भगवान परशुरामांच्या जयघोषांनी वातावरण दुमदुमून गेले होते.
शोभायात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, युवा ब्राह्मण संघ, सखी ब्राह्मण महिला आघाडी, समर्थ ब्राह्मण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शोभायात्रेच्या समारोपानंतर महिला विद्यालय येथे महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ब्राह्मण समुदायाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. परशुराम जन्मोत्सवानिमित्त आयोजित या शोभायात्रेतून धार्मिक व सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment