उदयोन्मुख तंत्रज्ञानांच्या पार्श्वभूमीवर शिक्षणविषयक चर्चा करणाऱ्या परिषदेचे गोव्यात आयोजन - अमृत महाराष्ट्र

उदयोन्मुख तंत्रज्ञानांच्या पार्श्वभूमीवर शिक्षणविषयक चर्चा करणाऱ्या परिषदेचे गोव्यात आयोजन

रोबोटिक्स, एआय आणि भविष्याभिमुख शिक्षण या विषयांवर होणार संवाद

उदयोन्मुख तंत्रज्ञानांच्या पार्श्वभूमीवर शिक्षणविषयक चर्चा करणाऱ्या परिषदेचे गोव्यात आयोजन मुख्य फोटो
मुख्य फोटो

वास्को (गोवा) : रोबॉटिक्स, आर्टिफिशयल इंटेलिजन्स यांसारख्या तंत्रज्ञानांमुळे शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, गोव्यातील वास्को येथील क्युरियस माइंड इन्फोटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 'एज्युकेटर्स मीट ऑन इमर्जिंग टेक्नॉलॉजिज' (एज्युमेट २०२६) या परिषदेचे आयोजन केले आहे. ही 'एज्युकेटर्स मीट' गोवा आणि शेजारील राज्यांतील शाळांचे मुख्याध्यापक व प्रशासकीय पदाधिकारी यांच्यासाठी असून, १७-१८ एप्रिल रोजी वास्को येथे होणार आहे.

यामध्ये रोबॉटिक्स, STEM (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनीअरिंग, मॅथेमॅटिक्स), शिक्षण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या विषयांतील नावीन्यपूर्ण संकल्पना मांडण्यात येणार आहेत. त्या संकल्पना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत असतील. शिक्षण क्षेत्रातील अधिकारपदावर असलेल्या व्यक्तींमध्ये संवाद, सहकार्य वाढवणे आणि विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम बनवणारे शिक्षण देण्याच्या दृष्टीने यात चर्चा होईल.

या कार्यक्रमात 'संकल्पना' ही गोवा STEM चॅलेंज स्पर्धा घेतली जाणार आहे. या परिषदेत शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी आणि परस्परसंवाद होणार असून, STEM विषयांवर आधारित कौशल्य शिक्षणावर विशेष चर्चाही होणार आहे.

१७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, १८ एप्रिलला दुपारच्या भोजनानंतर परिषदेची सांगता होणार आहे. १५ एप्रिलपूर्वी नोंदणी करणे बंधनकारक असून, नामनिर्देशित व्यक्तींची निवास, भोजन आणि प्रशिक्षण साहित्याची व्यवस्था आयोजकांकडून केली जाणार असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक योगेश केरकर यांच्याकडून देण्यात आली आहे.

संपर्क : 7447486633

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 09-04-2026 News publication date | Time: 10:08 PM News publication time | Views: 459 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 09-04-2026 News publication date | Time: 10:08 PM News publication time | Views: 459 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement