पुणेकरांना अनुभवता येणार श्रीमद्भगवद्गीतेचे सार सांगणारा भव्य नृत्याविष्कार - अमृत महाराष्ट्र

पुणेकरांना अनुभवता येणार श्रीमद्भगवद्गीतेचे सार सांगणारा भव्य नृत्याविष्कार

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या सामाजिक उपक्रमातून गरजूंच्या शिक्षणासाठी उभा राहणार निधी

पुणेकरांना अनुभवता येणार श्रीमद्भगवद्गीतेचे सार सांगणारा भव्य नृत्याविष्कार मुख्य फोटो
मुख्य फोटो

पुणे : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे जिल्हा शाखेतर्फे मे महिन्यात भव्य ब्राह्मण मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमद्भगवद्गीतेच्या १८ अध्यायांवर आधारित 'संभवामि युगे युगे' हा विशेष नृत्याविष्कार हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असून, या उपक्रमातून जमा होणारा निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरला जाणार आहे. हा कार्यक्रम नऊ मे रोजी सायंकाळी पाच वाजता पुण्यातील स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे.

सुप्रसिद्ध नृत्यांगना सौ. सोनाली करंदीकर आणि त्यांची टीम 'संभवामि युगे युगे' हा नृत्याविष्कार सादर करणार आहेत. श्रीमद्भगवद्गीतेच्या १८ अध्यायांचे सार आणि भगवान श्रीकृष्णाचा वैश्विक संदेश नृत्यकलेच्या माध्यमातून या वेळी मांडला जाईल. हा भव्य कलाविष्कार प्रेक्षकांना एक समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अनुभव देणारा ठरेल.

सामाजिक बांधिलकी हा या कार्यक्रमाचा महत्त्वाचा पैलू आहे. कार्यक्रमाच्या तिकीटविक्रीतून आणि देणगीच्या माध्यमातून संकलित होणारी सर्व रक्कम समाजातील गरीब व होतकरू मुलांच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी आणि ब्राह्मण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वापरली जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात आर्थिक मदतीची गरज असलेल्या विद्यार्थ्यांना बळ देण्यासाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी महासंघाने या विशेष कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.

या भव्य नृत्याविष्कार सोहळ्यासाठी प्रति व्यक्ती तिकीट दर ३०० रुपये असून, जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या मित्रपरिवारासह या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि सामाजिक कार्यात आपला खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

तिकीट बुकिंग किंवा स्वतंत्र देणगी देण्याकरिता हृषीकेश गोरे (९८५०१५४७३३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे शाखेकडून करण्यात आले आहे.

Publisher: Aaditya Kulkarni News publisher name | Date: 06-04-2026 News publication date | Time: 11:29 AM News publication time | Views: 2,611 Number of times this news has been viewed | District: pune Related district of the news
Publisher: Aaditya Kulkarni News publisher name | Date: 06-04-2026 News publication date | Time: 11:29 AM News publication time | Views: 2,611 Number of times this news has been viewed | District: pune Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement