कोल्हापूरच्या अंबाबाईचे मुख्य दर्शन १४ ते १७ मार्च या काळात बंद

संवर्धनाचे काम सुरू; या काळात घेता येईल उत्सवमूर्तीचे दर्शन

कोल्हापूरच्या अंबाबाईचे मुख्य दर्शन १४ ते १७ मार्च या काळात बंद मुख्य फोटो
कोल्हापूरच्या अंबाबाईचे मुख्य दर्शन १४ ते १७ मार्च या काळात बंद अतिरिक्त फोटो

कोल्हापूर : श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात सध्या पुरातत्त्व खात्याकडून संवर्धन, देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातही हे काम केले जाणार असल्याने १४ मार्च ते १७ मार्च २०२६ या चार दिवसांमध्ये मुख्य गाभाऱ्यातील देवीचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही.

या काळात मंदिरात देवीची उत्सवमूर्ती आणि तत्त्व कलश यांचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मंदिरातील दैनंदिन पूजा, आरती आणि इतर धार्मिक विधी नेहमीप्रमाणे सुरू राहतील, असे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.

काम पूर्ण झाल्यानंतर १८ मार्च २०२६पासून देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन पुन्हा नेहमीप्रमाणे घेता येणार आहे, असे मंदिर प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Publisher: Prashant Joshi News publisher name | Date: 13-03-2026 News publication date | Time: 02:52 PM News publication time | Views: 35 Number of times this news has been viewed | District: kolhapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words