अमरावतीतील अमृतपेठ प्रदर्शनात गौरी अभ्यंकर यांच्याकडील आकर्षक ज्वेलरी कलेक्शनदेखील उपलब्ध

सहा ते आठ मार्च या कालावधीत आवर्जून सहभागी होण्याचे ग्राहकांना आवाहन

अमरावतीतील अमृतपेठ प्रदर्शनात गौरी अभ्यंकर यांच्याकडील आकर्षक ज्वेलरी कलेक्शनदेखील उपलब्ध मुख्य फोटो
मुख्य फोटो

अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे लक्ष्यित गटातून उद्योजक घडवण्यासाठी आणि त्या उद्योजकांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्याअंतर्गत अमरावतीमध्ये सहा ते आठ मार्च या कालावधीत अमृतपेठ प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या भव्य प्रदर्शनामध्ये विविध प्रकारची व्यावसायिक उत्पादने ग्राहकांना पाहता आणि खरेदी करता येणार आहेत. त्यामध्ये ज्वेलरी कलेक्शनचाही समावेश असेल.

उद्योजिका गौरी अभ्यंकर सुंदर व आकर्षक अशा ज्वेलरी कलेक्शनची विक्री करतात. या भव्य प्रदर्शनामध्ये त्या सहभागी होणार असून, एस-१६ क्रमांकाचा स्टॉल त्यांचा असेल. विविध प्रकारची ट्रेंडी, पारंपरिक, तसेच आधुनिक डिझाइनची ज्वेलरी त्या स्टॉलवर विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. गौरी अभ्यंकर यांच्या ज्वेलरीला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून, आता त्यांची उत्पादने अमृतपेठ या ऑनलाइन माध्यमातूनही उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची मोठी संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ऑफलाइन प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहकांशी थेट संवाद साधता येतो, त्यांच्या आवडीनिवडी समजतात आणि व्यवसाय वाढीस चालना मिळते. त्यामुळे या प्रदर्शनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमरावती शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देऊन आपल्या आवडीच्या उत्पादनांची खरेदी करून उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सहा ते आठ मार्च २०२६ या कालावधीत अमरावतीतील बडनेरा रोडवरील जाधव पॅलेसमध्ये हे प्रदर्शन भरणार आहे. त्या वेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9527317068, 7249451152

पत्ता : अमृत विभागीय कार्यालय, 

घर क्रमांक 33, आशीर्वाद बिल्डिंग,

विदर्भ हाउसिंग कॉलनी, 

मालटेकडीसमोर, बस स्टँड रोड,

अमरावती - 444602

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: अश्विनी संजीव पुसतकर News publisher name | Date: 25-02-2026 News publication date | Time: 01:06 PM News publication time | Views: 127 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: अश्विनी संजीव पुसतकर News publisher name | Date: 25-02-2026 News publication date | Time: 01:06 PM News publication time | Views: 127 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words