अमृत संस्थेच्या प्रशिक्षण उपक्रमांमुळे आत्मनिर्भर भारत संकल्पनेला मिळतेय बळ

'अमृत'च्या उपक्रमातून ड्रोन पायलट बनलेल्या परभणीच्या भार्गवी कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून व्यक्त केली कृतज्ञता

अमृत संस्थेच्या प्रशिक्षण उपक्रमांमुळे आत्मनिर्भर भारत संकल्पनेला मिळतेय बळ मुख्य फोटो
अमृत संस्थेच्या प्रशिक्षण उपक्रमांमुळे आत्मनिर्भर भारत संकल्पनेला मिळतेय बळ अतिरिक्त फोटो

सेलू (परभणी) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध प्रशिक्षण उपक्रम राबवले जातात. ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रम त्यापैकीच एक आहे. कर्जतमध्ये अलीकडेच झालेल्या ड्रोन पायलट प्रशिक्षण उपक्रमात परभणी जिल्ह्यातील सेलू येथील भार्गवी राजेश कुलकर्णी याही सहभागी झाल्या होत्या. एरव्ही ज्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात, ते दर्जेदार प्रशिक्षण अमृत संस्थेतर्फे मोफत दिले जाते.

हे प्रशिक्षण मिळाल्याबद्दल भार्गवी कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांचे आणि अमृत संस्थेचे आभार मानले. या पत्रामध्ये त्यांनी असे म्हटले आहे, की 'अशा प्रशिक्षणांमुळे आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ मिळत आहे. अमृत संस्थेच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील युवक-युवतींना मुख्य प्रवाहात मोठी संधी प्राप्त झाली आहे. हे प्रशिक्षण केवळ अभ्यासक्रम नसून उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची पायरी ठरत आहे. महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) करत असलेल्या कार्याचा अभिमान आहे.' 

या संधीचा पुरेपूर उपयोग करून समाजहितासाठी व राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाहीही त्यांनी पत्रातून दिली आहे. अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी आणि अमृत संस्थेच्या परभणी टीमचेही कुलकर्णी यांनी आभार मानले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 21-02-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 194 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news
Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 21-02-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 194 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words