आम्ही भारताचे लोक…

भारतीय संविधान दिन २६ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. भारतीय संविधान अर्थात राज्यघटनेच्या निर्मितीसाठी २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. राज्यघटनेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने २६ नोव्हेंबर २०१५पासून संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली. आपल्या या राज्यघटनेची उद्देशिका (प्रीअँबल) वैशिष्ट्यपूर्ण असून, त्यातूनच तिच्या सर्वसमावेशकतेची कल्पना येते. ती मूळ इंग्रजीतील उद्देशिका आणि तिचा मराठी अनुवाद येथे देत आहोत….

आम्ही भारताचे लोक… मुख्य फोटो
आम्ही भारताचे लोक… अतिरिक्त फोटो

Preamble

WE, THE PEOPLE OF INDIA, having solemnly resolved to constitute India into a [SOVEREIGN SOCIALIST SECULAR DEMOCRATIC REPUBLIC] and to secure to all its citizens :

JUSTICE, social, economic and political;
LIBERTY of thought, expression, belief, faith and
worship;
EQUALITY of status and of opportunity;
and to promote among them all
FRATERNITY assuring the dignity of the individual
and the [unity and integrity of the Nation];

IN OUR CONSTITUENT ASSEMBLY this twentysixth day of November, 1949, do HEREBY ADOPT,
ENACT AND GIVE TO OURSELVES THIS CONSTITUTION.
………….
उद्देशिका
आम्ही भारताचे लोक, भारतास एक संपूर्ण सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकतंत्रात्मक गणराज्य बनविण्यास, तसेच त्याच्या समस्त नागरिकांना :

सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, धर्म आणि उपासनाची स्वतंत्रता, प्रतिष्ठा आणि संधिची समता प्राप्त करण्यासाठी, तसेच त्या सर्वांमध्ये व्यक्तीची गरिमा आणि राष्ट्राची एकता व अखंडता सुनिश्चित करणारी बंधुता वाढविण्यासाठी दृढ संकल्प करून आपल्या या संविधान सभेत आज दिनांक नोव्हेंबर २६, १९४९ ला एतद्द्वारे या संविधानाला अंगीकृत, अधिनियमित आणि आत्मार्पित करीत आहोत.
......
मराठी विश्वकोशातील नोंदीनुसार, घटनासमितीची बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी सुरू झाली, तरी प्रत्यक्ष वेगाने काम करण्यास सुरुवात झाली, ती भारत स्वतंत्र झाल्यानंतरच. भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याने सार्वभौम सत्ता घटनासमितीकडे आली आणि त्रिमंत्री योजनेतील निर्बंध नाहीसे झाले. घटनासमितीने एकूण २ वर्षे ११ महिने १८ दिवस काम केले. २६ जानेवारी १९५० पासून घटना अमलात आली आणि भारतीय प्रजासत्ताक (गणराज्य) जन्मास आले. घटनासमितीच्या कार्यामध्ये अनेक उपसमित्यांचे तिला बहुमोल साहाय्य झाले. संघ अधिकार, संघ सरकार घटना, राज्य सरकार घटना, अल्पसंख्याक व मूलभूत अधिकारविषयक समिती इत्यादी उपसमित्यांच्या बहुमोल कार्यामुळे घटनासमितीचे काम सुकर झाले होते. काँग्रेसचे पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद वगैरे नेतेच या उपसमित्यांचे नेतृत्व करीत. घटनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम भारत सरकारचे घटनाविषयक सल्लागार सर बी. एन. राव यांनी केले. या आराखड्यास अंतिम रूप देण्याचे काम ज्या मसुदासमितीकडे होते, त्या समितीचे अध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर होते व अल्लादी अय्यंगार, कन्हैयालाल मुन्शी आणि सय्यद मोहंमद सादुल्ला हे त्यांचे सभासद होते.

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 26-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 68 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 26-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 68 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words