गोंदियाच्या छोट्याशा गावातील पाथोडे पकोडेवाला तरुणांसाठी ठरतोय 'प्रेरणादीपक'

सालेकसा तालुक्यातील इशनाटोला गावातील तरुणाच्या स्टार्टअपची यशोगाथा

गोंदियाच्या छोट्याशा गावातील पाथोडे पकोडेवाला तरुणांसाठी ठरतोय 'प्रेरणादीपक' मुख्य फोटो
गोंदियाच्या छोट्याशा गावातील पाथोडे पकोडेवाला तरुणांसाठी ठरतोय 'प्रेरणादीपक' अतिरिक्त फोटो

गोंदिया : शिक्षण घेतल्यानंतर बहुतांश युवक नोकरीच्या मागे धावतात. नोकरी करणे वाईट असते असे नव्हे; मात्र स्वतःमध्ये उद्योजकीय कौशल्ये असली, तर ती वेळीच ओळखून त्यांचा अधिक विकास केला, तर चांगला उद्योग उभारून जीवनात यशस्वी होता येऊ शकते. गोंदियासारख्या दुर्गम जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील इशनाटोला या छोट्या गावातील दीपक पाथोडे यांचे उदाहरण या बाबतीत घेण्यासारखे आहे.

'बीकॉम'पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळेल अशी वाट न बघता त्यांनी स्वतःचा स्टार्टअप सुरू केला. 'पाथोडे पकोडेवाला' हे त्या स्टार्टअपचे नाव. हा व्यवसाय सुरू करण्यात त्यांना कोणताही कमीपणा वाटला नाही. मेहनत आणि सातत्य यातून आज ते रोज हजारो रुपयांची कमाई करत आहेत. आणखीही अनेकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

दीपक पाथोडे यांच्या पकोड्यांच्या स्टॉलने आज विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांचे वय कमी असले, तरी व्यवसायातील चिकाटी आणि गुणवत्ता खूप मोठी आहे. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास त्यांनी प्राप्त केला आहे आणि म्हणूनच त्यांचा व्यवसाय वेगाने वाढतो आहे. इशनाटोला या छोट्याशा गावात राहून ते आत्मनिर्भरतेचा आदर्श घालून देत आहेत आणि सुखी, समाधानी जीवन जगत आहेत. 

दीपक पाथोडे यांची ही यशोगाथा तरुणांसाठी असा संदेश देते, की 'नोकरीमागे धावण्यापेक्षा, स्वतःचा मार्ग तयार करा. संधी स्वतः निर्माण करा.'


Publisher: Kartik Tiwari News publisher name | Date: 06-02-2026 News publication date | Time: 06:35 PM News publication time | Views: 2,842 Number of times this news has been viewed | District: gondia Related district of the news
Publisher: Kartik Tiwari News publisher name | Date: 06-02-2026 News publication date | Time: 06:35 PM News publication time | Views: 2,842 Number of times this news has been viewed | District: gondia Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words