स्वतःची ओळख निर्माण करणारी लता कुंभारे यांची प्रेरणादायी यशोगाथा

लता कुंभारे यांची यशोगाथा ही मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळविण्याचे प्रेरणादायी उदाहरण आहे.

स्वतःची ओळख निर्माण करणारी लता कुंभारे यांची प्रेरणादायी यशोगाथा मुख्य फोटो
स्वतःची ओळख निर्माण करणारी लता कुंभारे यांची प्रेरणादायी यशोगाथा अतिरिक्त फोटो

गोंदिया, प्रतिनिधी :


स्वतःच्या कष्टाच्या, जिद्दीच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर व्यवसायात यश मिळवून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांमध्ये गोंदियातील लता राजकुमार कुंभारे यांचे नाव आज विशेष उल्लेखनीय ठरत आहे.


गोंदिया शहरातील मामा चौक, पेट्रोल पंपाजवळ लता कुंभारे यांनी जानेवारी २०२४ मध्ये मंचूरियन, मोमोज आणि फ्रेंच फ्राईजचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला छोट्या प्रमाणात सुरू केलेल्या या व्यवसायाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. स्वादिष्ट चव, स्वच्छता आणि ग्राहकांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध यामुळे अल्पावधीतच त्यांचा व्यवसाय परिसरात लोकप्रिय झाला आहे.


अलीकडे अमृत संस्थेचे कर्मचारी त्यांच्या स्टॉलवर गेले असता त्यांनी तेथील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. पदार्थांची चव आणि गुणवत्तेमुळे त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी लता ताईंनी सांगितले की, "जानेवारी महिन्यात व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला काही अडचणी होत्या, परंतु सातत्यपूर्ण मेहनत आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे आज व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढत आहे. या व्यवसायामुळे मला स्वतःची स्वतंत्र ओळख मिळाली आहे."


यावेळी अमृत संस्थेच्या प्रतिनिधींनी त्यांना अमृत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व इतर उद्योजकता विकास योजनांची माहिती दिली. या योजनांचा लाभ घेऊन व्यवसायाचा विस्तार करणे, नवीन साहित्य खरेदी करणे आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे शक्य होऊ शकते.


अमृत (Academy of Maharashtra Research, Upliftment and Training) ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत आहे. संस्थेमार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शैक्षणिक अर्थसाहाय्य, उद्योजकता विकास तसेच वैयक्तिक कर्जावरील व्याज परतावा यांसारख्या विविध योजना राबविल्या जातात.


लता कुंभारे यांची यशोगाथा ही महिलांच्या स्वावलंबनाचे प्रेरणादायी उदाहरण आहे. जिद्द, परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाच्या सहाय्याने कोणतीही व्यक्ती स्वतःची ओळख निर्माण करू शकते, हा संदेश त्यांच्या यशस्वी प्रवासातून मिळतो. नवउद्योजकांनीही शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय उभारावा व आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना शासकीय संस्था, आयोग किंवा महामंडळ यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Kartik Tiwari News publisher name | Date: 23-06-2026 News publication date | Time: 12:30 AM News publication time | Views: 118 Number of times this news has been viewed | District: Gondia Related district of the news
Publisher: Kartik Tiwari News publisher name | Date: 23-06-2026 News publication date | Time: 12:30 AM News publication time | Views: 118 Number of times this news has been viewed | District: Gondia Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement