ईडीपी प्रशिक्षणातून व्यवसायाला नवी दिशा

श्री. भूषण जोशी - अचलपूर यांना व्याज परतावा योजनेतून ₹ ६१,८४९ ची आर्थिक मदत

ईडीपी प्रशिक्षणातून व्यवसायाला नवी दिशा मुख्य फोटो
मुख्य फोटो

अमरावती : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) व व्याज परतावा योजनेचा लाभ घेत अचलपूर येथील उद्योजक श्री. भूषण जोशी यांनी आपल्या व्यवसायाच्या प्रगतीकडे यशस्वी पाऊल टाकले आहे.


श्री. भूषण जोशी हे अचलपूर येथील भूषण मेडिकल स्टोअरचे संचालक आहेत. त्यांनी अमृत कौशल्य योजनेअंतर्गत अमरावती येथे आयोजित करण्यात आलेले उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP) पूर्ण केले. या प्रशिक्षणामध्ये व्यवसाय नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, ब्रँडिंग, पॅकेजिंग, मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, ग्राहक व्यवस्थापन तसेच व्यवसाय विस्ताराच्या विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.


प्रशिक्षणानंतर श्री. जोशी यांनी अमृतच्या व्याज परतावा योजनेसाठी अर्ज केला. अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना ₹६१,८४९ इतकी व्याज परताव्याची रक्कम मंजूर होऊन त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली.


याबाबत प्रतिक्रिया देताना श्री. भूषण जोशी यांनी सांगितले की, "अमृतच्या ईडीपी प्रशिक्षणामुळे व्यवसायाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला. तसेच व्याज परतावा योजनेमुळे मिळालेली आर्थिक मदत व्यवसायाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत अमृत अमरावती जिल्हा कार्यालय व श्री. ऋषिकेश सर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले."


अमृतच्या विविध कौशल्य, उद्योजकता व आर्थिक सहाय्य योजनांमुळे राज्यातील अनेक युवक व उद्योजकांना स्वावलंबनाची नवी संधी उपलब्ध होत असून, व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक पाठबळ मिळत आहे.

Publisher: Rushikesh Harish Kathalkar News publisher name | Date: 22-06-2026 News publication date | Time: 03:02 PM News publication time | Views: 458 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: Rushikesh Harish Kathalkar News publisher name | Date: 22-06-2026 News publication date | Time: 03:02 PM News publication time | Views: 458 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement