महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या राज्य शासनाच्या संस्थेकडूनमनीष मिलिंद पाटील यांना आतापर्यंत तब्बल ₹१,७६,१३० इतका वैयक्तिक कर्जावरील व्याज परतावा मिळाला आहे.
महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या राज्य शासनाच्या संस्थेकडून मनीष मिलिंद पाटील यांना आतापर्यंत तब्बल ₹१,७६,१३० इतका वैयक्तिक कर्जावरील व्याज परतावा मिळाला आहे. याबद्दल त्यांनी अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडीलकर यांचेही त्यांनी विशेष आभार व्यक्त केले. मनीष पाटील यांनी सांगितले की, या योजनेमुळे त्यांच्या व्यवसायाला मोठा आधार मिळाला आहे. त्यांचे पेपर बॅग्स तयार करण्याचा कारखाना असून, आर्थिक मदतीमुळे व्यवसाय अधिक सक्षमपणे पुढे नेणे शक्य झाले आहे. तसेच त्यांनी सांगितले की, समाजातील प्रत्येक घटकाने या योजनेचा लाभ घ्यावा. इतरही अनेक योजना उन्नती देणाऱ्या असून नागरिकांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. योजनेची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व नाशिक जिल्हा टीमचेही त्यांनी आभार मानले. अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर संपर्क साधावा- अमृत नाशिक जिल्हा कार्यालय, १, सदानंद सोसायटी, स्वप्निल पार्क, टिळकवाडी, नाशिक - ४२२००२ मोबाईल नंबर - 9112228770
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment