राही सरनोबत

आपल्या प्रयत्नांच्या जोरावर अचूक नेम साधलेली खेळाडू

राही सरनोबत मुख्य फोटो
मुख्य फोटो

३० ऑक्टोबर १९९० रोजी कोल्हापुरात जन्मलेल्या राहीचे शूटिंग करिअर २००८मध्ये सुरू झाले होते. इयत्ता १०वी ची परीक्षा पास झाल्यानंतर अनेक क्रीडा प्रकारांत तिने प्रयत्न केले. अखेर तिला २५ मीटर पिस्तुल शूटिंगचे तंत्र जमले. राहीने विज्ञान क्षेत्रात करिअर करावे अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. पण राहीची इच्छा पाहून ते शूटिंगच्या ट्रेनिंगसाठी तयार झाले. २००८मध्ये ते नेमबाजीचे प्रशिक्षक अजित पाटील यांना भेटले आणि त्यांना राहीला प्रशिक्षण देण्यासाठी राजी केले. श्री. पाटील यांच्या प्रशिक्षणामुळे राही एक उत्तम नेमबाज बनली.

त्यानंतर तिने पुणे येथे शूटिंगचे पुढील ट्रेनिंग केले. राही शूटिंग वर्ल्ड कपच्या पिस्तुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. तिने वर्ष २०१३मध्ये दक्षिण कोरियाच्या चांगवानमध्ये झालेल्या ISSF वर्ल्ड कपमध्ये २५ मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. तिने अमेरिकेत झालेल्या वारस २०११ वर्ल्ड कपमध्येही कांस्यपदकाची कमाई केली होती. राहीने २०१०मध्ये राष्ट्रकुल स्पर्धांत भारतासाठी रौप्यपदक मिळवले होते. त्यानंतर २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये राही भारताची सर्वांत कमी वयाची नेमबाज होती. २०१५च्या अखेरीस कोपराच्या दुखापतीमुळे राहीला रियो ऑलिम्पिक्समध्ये क्वालिफाय करता आले नव्हते. त्यानंतर १८व्या आशियाई स्पर्धेत २५ मीटर पिस्तुल शूटिंगमध्ये राही सरनोबत हिने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 06-02-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 2 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 06-02-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 2 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement