बीटिंग रीट्रीट सेरेमनी

प्रजासत्ताक दिनाच्या दिमाखदार सोहळ्याच्या सांगतेचा कार्यक्रम

बीटिंग रीट्रीट सेरेमनी मुख्य फोटो
मुख्य फोटो

देशाच्या ७७वा प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा नुकताच पार पडला. २९ जानेवारी रोजी या सोहळ्याची सांगता होईल ती बीटिंग रीट्रीट या कार्यक्रमाने. राजधानी नवी दिल्लीतील विजय चौकात हा कार्यक्रम होईल. त्याविषयी ही थोडीशी माहिती

बीटिंग रीट्रीट सोहळ्याचा इतिहास १७व्या शतकापर्यंत मागे जातो. इंग्लंडमध्ये जवळ गस्त घालणाऱ्या तुकड्यांना त्यांच्या किल्ल्याकडे परत बोलावण्यासाठी हा सोहळा केला जाई. बीटिंग रीट्रीटमध्ये सहसा तोफ वाजवणे, बँडचे मार्चिंग आणि इतर सादरीकरण असते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५०च्या दशकात एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलिप यांनी पहिल्यांदा भारताला भेट दिली तेव्हा बीटिंग रीट्रीट सोहळा सुरू झाला. ही कल्पना भारतीय सैन्यातील एका पायदळ रेजिमेंटच्या ग्रेनेडियर्स रेजिमेंटमधील अधिकारी मेजर गॅरोबर्ट्स यांनी मांडली होती. आता प्रजासत्ताक दिनाचा उत्सव अधिकृतपणे बीटिंग रीट्रीट सोहळ्याने संपतो. हा बीटिंग रीट्रीट सोहळा दर वर्षी २९ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत आयोजित केला जातो. 

हा समारंभ भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या विभाग ‘डी’द्वारे आयोजित केला जातो. राजधानीत रायसीना हिल्स परिसरात राष्ट्रपती भवनासारख्या महत्त्वाच्या इमारपती आहेत. त्या परिसरात हा सोहळा साजरा होतो. भारतीय सैन्याच्या पाइप बँडचे सादरीकरण या वेळी होते. भारतीय हवाई दल, नौदल आणि लष्कराच्या एकत्रित बँडद्वारे काही देशी धून वाजवून हा कार्यक्रम साजरा केला जातो. २०१६पासून दिल्ली पोलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या बँडचेही बीटिंग रीट्रीट सोहळ्यात सादरीकरण केले जाते. भारतीय सैन्यदलाच्या सामर्थ्याची झलक प्रजासत्ताकदिनी पाहायला मिळते. त्यात दर वर्षी अधिकाधिक वाढ व्हावी, या सदिच्छेने बीटिंग रीट्रीट सोहळ्याने या समारंभाची सांगता होते.

(संकलित)


Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 29-01-2026 News publication date | Time: 05:55 AM News publication time | Views: 63 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 29-01-2026 News publication date | Time: 05:55 AM News publication time | Views: 63 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words