हिंदी साहित्य व भक्तीपरंपरेतील महान संत-कवी गोस्वामी तुलसीदास यांची जयंती १९ ऑगस्ट रोजी श्रद्धेने साजरी करण्यात येते. त्यांच्या साहित्याने भारतीय भक्तीपरंपरा समृद्ध केली असून, त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत.
हिंदी साहित्य आणि भक्तीपरंपरेतील महान संत-कवी गोस्वामी तुलसीदास यांची जयंती आज आहे . भगवान श्रीरामांच्या आदर्श जीवनाचा, भक्तीचा, सत्याचा आणि सदाचाराचा संदेश त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचविला.
तुलसीदास यांनी भारतभर भ्रमण केले. तत्कालीन तुलसीदास यांनी भारतभर भ्रमण केले. तत्कालीन हिंदू समाजावर झालेले आक्रमण पाहून ते अतिशय दुःखी झाले. त्यानी भारतातील सर्व राजांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. पण हे प्रयत्न सफल झाले नाहीत. तरीही तुलसीदास यांनी या आक्रमणाचे स्वरूप समजावून सांगितले. प्रबोधन केल्याने अनेक राजांनी सामना केला. सामान्य लोकांमध्येही त्यानी जनजागृती केली. हिंदू धर्म हा एक आहे, त्यास पंथात विभागू नका हे त्यांनी सांगितले. तुलसीदासांनी रामलीला नाट्य-प्रकारची सुरुवात केली.
सन १५७४ मध्ये रामनवमीच्या दिवशी श्री रामचरितमानस हा ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी संस्कृतमधील वाल्मीकी रामायणाचे अवधी भाषेत रूपांतर करून त्याचे नाव 'रामचरितमानस' असे ठेवले. हे लेखन त्यांनी दोन वर्षे सात महिने सव्वीस दिवसात पूर्ण केले होते. तसेच हा त्यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ मानला जातो तसेच त्यांच्या कार्यामुळे त्यांना महर्षी वाल्मिकीचा अवतार मानला जातो.
त्यांची ग्रंथसंपदा-
रामभक्ती, धर्म, करुणा, कर्तव्य आणि मानवी मूल्ये हा त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू होता. त्यांच्या लेखणीतून श्रीराम हे आदर्श राजा, आदर्श पुत्र आणि आदर्श मानव म्हणून जनमानसात रुजले. परहित आणि सदाचाराचा त्यांचा संदेश आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे.
“परहित सरिस धरम नहि दूजा, पर पीड़ा सम नहि अधमाई।”
या विचारातून परहितापेक्षा श्रेष्ठ धर्म नाही आणि दुसऱ्याला दुःख देण्यासारखा अधर्म नाही, असा संदेश मिळतो.गोस्वामी तुलसीदास जयंतीनिमित्त संत-कवी तुलसीदासांना विनम्र अभिवादन.
-संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment