यवतमाळ येथे अमृत, यवतमाळ जिल्हा कार्यालयाच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.
यवतमाळ येथे अमृत, जिल्हा कार्याल यवतमाळ यांच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास मुख्य वक्ते म्हणून पूर्वेश उपासनी उपस्थित होते. तसेच युवा ब्राह्मण संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मुख्य वक्ते पूर्वेश उपासनी यांनी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम, नेतृत्वगुण आणि राष्ट्रनिष्ठेचा जीवनप्रवास उपस्थितांसमोर मांडला.
अल्पावधीत आपल्या असामान्य युद्धकौशल्याच्या बळावर मराठा साम्राज्याचा विस्तार करणाऱ्या बाजीराव पेशवे यांच्या कार्याचा आणि त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा विविध उदाहरणांसह परिचय करून देण्यात आला. तरुण पिढीने इतिहासातील अशा महान व्यक्तिमत्त्वांच्या जीवनातून शौर्य, ध्येयवाद, नेतृत्व आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या कार्याची आणि विचारांची नव्या पिढीला ओळख करून देण्याचा तसेच त्यांच्या प्रेरणादायी इतिहासाचे स्मरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर, युवा ब्राह्मण संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
अधिक माहितीसाठी संपर्क : परिक्षीत कमलकिशोर शर्मा जिल्हा व्यवस्थापक ९११२२२७६३३ जिल्हा कार्यालय पत्ता : स्वामी समर्थ विहार, पहिला माळा, फ्लॅट क्रमांक ए-१, अवधूतवाडी, तिवारी चौक, यवतमाळ - ४४५ ००१ ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment