भगवान बालाजी मंदिरात झाली विशेष बैठक
नरसी (नांदेड) : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेने अमृत उद्योग कौशल्यवर्धन (ईडीपी) उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमासह संस्थेच्या अन्य सर्व योजनांची माहिती देण्यासाठी नरसी (ता. नायगाव, जि. नांदेड) येथील भगवान श्री बालाजी मंदिरात एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील व्यापारी या वेळी उपस्थित होते.
अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपस्थितांनी योजनांची माहिती घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला. लक्ष्यित गटातील व्यापाऱ्यांच्या विनंतीनुसार अमृत संस्थेने व्यापाऱ्यांच्या सोयीकरिता रात्री आठनंतर ही बैठक घेतली होती. आर्य वैश्य महासभेच्या राज्य बांधकाम समितीचे सदस्य बालाजी गणेशराव कोटूरवार मुगावकर यांनी बैठकीचे नियोजन केले होते.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment