इंद्रा नूयींची प्रेरक कथा

जिद्द आणि चिकाटीचा अद्भुत प्रवास

इंद्रा नूयींची प्रेरक कथा मुख्य फोटो
मुख्य फोटो

जगात सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिद्द आणि चिकाटी, मेहनत करण्याची तयारी. हे गुण तुमच्यात असतील, तर मग तुम्ही स्त्री आहात की पुरुष, वयाने लहान आहात की मोठे किंवा शहरातील आहात की ग्रामीण भागातले, याने काही फरक पडत नाही. तुमचा संघर्ष आणि संयमच तुम्हाला त्या अढळपदापर्यंत नेतो. अशीच एक संघर्षगाथा आहे इंद्रा नूयी यांची.

भारतीय-अमेरिकन इंद्रा नूयी या कोणी अपरिचित नाहीत. जेव्हा जेव्हा शक्तिशाली आणि यशस्वी महिलांची चर्चा होते, तेव्हा इंद्रा नूयी यांचेही नाव पुढे येते. त्या पेप्सिकोच्या अध्यक्ष आणि सीईओ होत्या. २०१८मध्ये नूयी पेप्सिकोच्या सीईओ म्हणून निवृत्त झाल्या. २००७ ते २०१९ या काळात त्या पेप्सिकोच्या अध्यक्षा होत्या. इंद्रा नूयी यांच्या यशामागे त्यांची मेहनत आणि समर्पण आहे. 

इंद्रा नूयी यांचा जन्म १९५५ मध्ये तमिळनाडू राज्यात झाला. त्यांचे वडील स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये काम करत होते, तर आजोबा जिल्हा न्यायाधीश होते. नूयी यांनी त्यांचे शालेय शिक्षण त्यांच्या गावातूनच केले. त्यानंतर त्यांनी मद्रास विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले. ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयात पदवीधर आहे. कलकत्त्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. १९७८मध्ये नूयी यांनी येल स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्रवेश घेतला आणि १९८०मध्ये सार्वजनिक आणि खासगी व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. येल येथे शिकत असताना पहिल्या नोकरीच्या मुलाखतीसाठी वेस्टर्न सूट खरेदी करण्यासाठी पैसे वाचवण्यासाठी त्यांनी रिसेप्शनिस्ट म्हणून रात्रीच्या शिफ्टमध्ये काम केले. 

नूयी यांनी मुंबईतील समर इंटर्नशिपअंतर्गत अणुऊर्जा विभागात काम केले. ग्रॅज्युएशननंतर त्यांनी जॉन्सन अँड जॉन्सनमधून करिअरला सुरुवात केली आणि कंपनीमध्ये उत्पादन व्यवस्थापक म्हणून काम केले. मुंबईतील एका कापड कंपनीतही काम केले. १९८०मध्ये येल स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून पदवी घेतल्यानंतर त्या बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपमध्ये (बीसीजी) सहभागी झाल्या. तेथे त्यांनी सहा वर्षे सल्लागार म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी मोटोरोला आणि अभियांत्रिकी कंपनी एबीबी येथे कार्यकारी पदांवर काम केले. 

नूयी १९९४मध्ये पेप्सिको कंपनीसह कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी आणि डेव्हलपमेंटच्या वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून रुजू झाल्या. २००१मध्ये त्यांची कंपनीच्या सीएफओपदी नियुक्ती करण्यात आली आणि पाच वर्षांनी म्हणजेच २००६मध्ये त्या कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ बनवण्यात आलं. इंद्रा नूयी पेप्सिकोच्या पाचव्या आणि पहिल्या महिला सीईओ होत्या. सोबतच एक फॉर्च्युन फिफ्टी कंपनी चालवणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला होत्या.

इंद्रा नूयी यांनी ३०० पानांच्या पुस्तकात त्यांचे संपूर्ण आयुष्य मांडले आहे. या पुस्तकाचे नाव आहे 'माय लाइफ इन फुल : वर्क, फॅमिली अँड अवर फ्युचर.' नूयी यांनी या पुस्तकात त्यांच्या बालपणापासून ते पेप्सिकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी होण्यापर्यंतच्या घटनांचा तपशील दिला आहे. अशा या कर्तबगार महिलेला वंदन!

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 14-01-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 5 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 14-01-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 5 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement