बुलढाण्याच्या लेकीची संशोधनविश्वात भरारी- डॉ. प्रियंका राठी यांना फार्मास्युटिकल सायन्सेसमध्ये पीएच.डी.

जिद्द, चिकाटी आणि संशोधनाची आवड यांच्या बळावर बुलढाण्याच्या कन्येने शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. प्रियंका चित्तरंजन राठी यांनी फार्मास्युटिकल सायन्सेस विषयात उल्लेखनीय संशोधन पूर्ण करत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्याकडून 'डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.)' ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी प्राप्त केली आहे.

बुलढाण्याच्या लेकीची संशोधनविश्वात भरारी- डॉ. प्रियंका राठी यांना फार्मास्युटिकल सायन्सेसमध्ये पीएच.डी. मुख्य फोटो
मुख्य फोटो

बुलढाण्याच्या लेकीची संशोधनविश्वात भरारी; डॉ. प्रियंका राठी यांना फार्मास्युटिकल सायन्सेसमध्ये पीएच.डी. बुलढाणा, दि. 23 जुलै : जिद्द, चिकाटी आणि संशोधनाची आवड यांच्या बळावर बुलढाण्याच्या कन्येने शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. प्रियंका चित्तरंजन राठी यांनी फार्मास्युटिकल सायन्सेस विषयात उल्लेखनीय संशोधन पूर्ण करत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्याकडून 'डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.)' ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी प्राप्त केली आहे. अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी, चिखली येथील संशोधन केंद्रात त्यांनी आपले संशोधन कार्य पूर्ण केले. वनस्पतींपासून प्राप्त होणाऱ्या नैसर्गिक घटकांच्या साहाय्याने औषध वितरण प्रणाली अधिक प्रभावी करण्याच्या दिशेने त्यांनी केलेले संशोधन फार्मास्युटिकल सायन्सेस क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहे. या संशोधनासाठी अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कैलास आर. बियाणी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेल्या संशोधनामुळे औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रात नव्या संशोधनाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. संशोधनाच्या अंतिम ओपन डिफेन्स परीक्षेत प्रियंका राठी यांनी आपल्या संशोधनाची उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि निष्कर्ष प्रभावीपणे मांडले. उपस्थित तज्ज्ञांच्या प्रश्नांना त्यांनी आत्मविश्वासाने व अभ्यासपूर्ण उत्तरे देत आपल्या संशोधनाची गुणवत्ता सिद्ध केली. बाह्यपरीक्षक म्हणून चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेज, लातूरचे प्राचार्य डॉ. अविनाश टेकाडे उपस्थित होते. पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्यानंतर शैक्षणिक, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी मार्गदर्शक डॉ. कैलास आर. बियाणी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, कुटुंबीय, मित्रपरिवार आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांना दिले आहे. डॉ. प्रियंका राठी यांच्या या यशामुळे चिखलीसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला असून संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्या प्रेरणादायी ठरल्या आहेत. त्यांच्या यशाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे— "मुली संधी मिळाली तर केवळ बरोबरीच करत नाहीत, तर यशाची नवी उंचीही गाठतात.

Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 24-07-2026 News publication date | Time: 04:15 PM News publication time | Views: 62 Number of times this news has been viewed | District: Buldhana Related district of the news
Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 24-07-2026 News publication date | Time: 04:15 PM News publication time | Views: 62 Number of times this news has been viewed | District: Buldhana Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement