जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर उभारलेला दुग्ध व्यवसाय

वय ही केवळ एक संख्या असते, हे आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करणाऱ्या सौ. स्मिता सुनील जोशी (रा. खामसवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव) यांनी आपल्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दुग्ध व्यवसायात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर उभारलेला दुग्ध व्यवसाय मुख्य फोटो
मुख्य फोटो

सौ. जोशी या पूर्वी MCED मध्ये फॅशन डिझाईन प्रशिक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्यांचा मुलगा मुंबई येथे IT Engineer म्हणून कार्यरत आहे. कुटुंबाकडे सुमारे ७ एकर शेती असून ती अधिक उत्पादक करण्याच्या उद्देशाने त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्यांनी यशस्वी दुग्ध व्यावसायिकांना भेटी देऊन मार्गदर्शन घेतले. त्यानंतर हरियाणा येथून मुर्रा जातीच्या उच्च प्रतीच्या म्हशी आणून आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली.

आज त्यांच्या गोठ्यात १० मुर्रा म्हशी असून त्यांच्याकडून दररोज सकाळ-संध्याकाळ मिळून सुमारे १५० लिटर दूध उत्पादन होते. हे दूध प्रति लिटर ७० रुपये दराने विकले जाते.

विशेष म्हणजे, त्यांचे शेत घरापासून सुमारे ४ किलोमीटर अंतरावर आहे. शेताकडे जाणारा रस्ता पूर्णपणे सोयीस्कर नसतानाही त्या दररोज सकाळी स्वतः चालत शेतात जातात. दूध स्वतः रस्त्यापर्यंत आणतात आणि गोठ्यातील बहुतांश कामेही स्वतःच्या मेहनतीने करतात.

वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतरही त्यांची काम करण्याची ऊर्जा, शिस्त आणि चिकाटी एखाद्या तरुणालाही प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या कार्यातून महिलांनी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी स्वावलंबनाचा आदर्श घ्यावा, असा संदेश मिळतो.

त्यांच्या या प्रेरणादायी कार्याची दखल घेत अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. चिन्मय कुलकर्णी यांनी त्यांच्या शेताला भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी सौ. जोशी यांच्या मेहनतीचे कौतुक करत, "समाजातील प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या जिद्दी, परिश्रम आणि स्वावलंबी वृत्तीचा आदर्श घ्यावा," असे सांगितले.

अमृत परिवाराच्या वतीने सौ. स्मिता सुनील जोशी यांना त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या असून, त्यांची यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

आपण ज्या वयात निवृत्तीचे विचार करतो,त्या वयात स्मिता ताईनी केलेली व्यवसाय उभारणी नक्कीच प्रेरणादायी आहे. आज खेडेगावे ओस पडत आहेत,असे असताना ग्रामीण भागात राहून अशा प्रकारचा व्यवसाय हे सोपे नाही,म्हणूनच आजच्या पिढीने त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा.


Publisher: Chinmay Kulkarni News publisher name | Date: 18-07-2026 News publication date | Time: 03:53 PM News publication time | Views: 1,715 Number of times this news has been viewed | District: Dharashiv Related district of the news
Publisher: Chinmay Kulkarni News publisher name | Date: 18-07-2026 News publication date | Time: 03:53 PM News publication time | Views: 1,715 Number of times this news has been viewed | District: Dharashiv Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

V
VIKAS V KERURKAR
19-07-2026 03:22 PM

Good Afternoon sir/mam please organise the manufacturing & marketing cafe supply product like friench fries & other products using the potato this is good for farmers growth the production potato more demand in Market
Thank you

Write a Comment
0 / 50 words
Advertisement