स्वामी विवेकानंदांच्या विचारांना उजाळा
गडचिरोली : स्वामी विवेकानंदांची जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिवस अमृत संस्थेच्या गडचिरोली जिल्हा कार्यालयामध्ये साजरा करण्यात आला. या वेळी स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बुर्ले मॅडम, तन्मय देशपांडे यांच्यासह अमृत संस्थेच्या जिल्हा व्यवस्थापक सौ. माधुरी रोडकर, जिल्हा उपव्यवस्थापक गौरव दुपल्लीवार, जिल्हा उपव्यवस्थापक विजय चौधरी, अमृतमित्र वेदान्त मेहता आदी उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद हे बहुपैलू असे महान भारतीय व्यक्तिमत्त्व होते. युवकांमध्ये देश बदलण्याची ताकद आहे, असे ते म्हणत असत. युवकांना स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित करणे आणि देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करणे असा हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment