गोंदियातील आरोग्यदायी धुपाचा दरवळ राज्यभर 'चैतन्य' निर्माण करण्यासाठी सज्ज

विशीतील उद्योजकाचे पर्यावरणपूरक उत्पादन 'अमृतपेठ'वर उपलब्ध

गोंदियातील आरोग्यदायी धुपाचा दरवळ राज्यभर 'चैतन्य' निर्माण करण्यासाठी सज्ज मुख्य फोटो
गोंदियातील आरोग्यदायी धुपाचा दरवळ राज्यभर 'चैतन्य' निर्माण करण्यासाठी सज्ज अतिरिक्त फोटो

गोंदिया : आजच्या काळात उद्योग आणि औद्योगिक उत्पादने मोठ्या प्रमाणावर असतात; मात्र त्यातील पर्यावरणपूरक उत्पादने फार मर्यादित प्रमाणात असतात. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील २० वर्षांच्या चैतन्य विशाल विरुडकर या तरुणाने या बाबतीत एक आदर्श घालून दिला आहे. त्याने एक हरित उद्योग उभारला असून, त्यात हानिकारक रसायनमुक्त, पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी धूप तयार केला जातो. अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या अमृतपेठ या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हा धूप विक्रीला उपलब्ध झाल्याने आता राज्यभरातील ग्राहक हे दर्जेदार उत्पादन खरेदी करू शकणार आहेत. 

चैतन्य विरुडकरने गायीचे शेण, राळ, गुग्गुळ हे घटक वापरून हा सुगंधी, आरोग्यदायी, पर्यावरणपूरक धूप तयार केला आहे. 'रसायनांपासून परिवाराला वाचवा' या संदेशासह हे उत्पादन अमृतपेठ प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हा धूप पूर्णतः नैसर्गिक घटकांपासून बनवला जातो. त्यात कोणतेही रसायन वापरले जात नाही. या धुपाच्या धुरामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते. निसर्ग/पर्यावरण प्रदूषित न करता शुद्धता जपणे, या उद्देशाने चैतन्यने हे उत्पादन तयार केले आहे.

चैतन्यने तयार केलेल्या या इको-फ्रेंडली धुपाला मुंबईतूनही मागणी असून, ग्रामीण भागातील नवउद्योजकांसाठी ही मोठी प्रेरणादायी बाब ठरत आहे. कमी वयात पर्यावरणपूरक उद्योग उभारून चैतन्य विरुडकरने तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

तुम्हालाही हा धूप घरपोच मागवायचा आहे का? त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amrutpeth.com/product/incense-dhoop-cones-nkByw

.............

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Kartik Tiwari News publisher name | Date: 12-01-2026 News publication date | Time: 09:51 PM News publication time | Views: 2,130 Number of times this news has been viewed | District: gondia Related district of the news
Publisher: Kartik Tiwari News publisher name | Date: 12-01-2026 News publication date | Time: 09:51 PM News publication time | Views: 2,130 Number of times this news has been viewed | District: gondia Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words