साल्हेरच्या विजयाची कथा

पाच जानेवारी १६७१ रोजी शिवाजी महाराजांनी साल्हेरचा किल्ला जिंकून स्वराज्यात घेतला.

साल्हेरच्या विजयाची कथा मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज! छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच शत्रूला अक्षरशः घाम फुटत असे. शिवाजी महाराजांनी मोजक्या सैन्याच्या बळावर स्वत:चे राज्य निर्माण केले. त्यांच्या काळात औरंगजेबाला पळता भुई थोडी झाली होती. शिवाजी महाराजांनी खूप गड-किल्ले जिंकले, त्यातीलच एक साल्हेरचा किल्ला आहे.

साल्हेर आणि मुल्हेर या जोडीतला साल्हेर हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वांत उंच किल्ला असून, तो नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील बागलाण प्रांतात आहे. आता तो सटाणा या तालुक्यामध्ये समाविष्ट असून, अलीकडेच तो युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीतही समाविष्ट झाला आहे. शिवाजी महाराजांनी पाच जानेवारी १६७१ रोजी साल्हेरचा दुर्ग जिंकला. शिवाजी महाराजांकडून तो परत मिळवण्यासाठी मुघल फौजा चाल करून आल्या आणि त्यांनी साल्हेरच्या दुर्गाला वेढा घातला. हा वेढा फोडण्यासाठी शिवाजी राजांनी मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर यांना पाठवले. त्या वेळी इख्लासखान हा मुघल सेनेचा अधिपती होता. मराठा सैनिकांनी एका बाजूने त्यांनी लष्कारांची घोडी घेतली आणि एका बाजूने मावळे आत घुसले आणि त्यानंतर मोठे युद्ध झाले. मुघलांची फौज लाखाच्या आसपास होती, तर मराठ्यांची फौज सुमारे पन्नास हजार इतकीच होती. या युद्धामध्ये खूप मावळे धारातीर्थी पडले. परंतु तरीदेखील मराठे विजयी झाले. खूप खजिनादेखील सापडला. हे युद्ध मराठ्यांच्या प्रतिष्ठेचे युद्ध होते आणि ते मराठे जिंकले.
या मावळ्यांनी शत्रूला सळो की पळो करून सोडले. या साल्हेरच्या युद्धाचा मुघलांच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला आणि शिवाजी महाराज अजिंक्य आहेत, असे ते मानू लागले. अशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या युक्तीने साल्हेर जिंकला आणि शत्रूला धूळ चारली. छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती आणि लढवय्ये यांना सादर प्रणाम!!

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 05-01-2026 News publication date | Time: 08:17 PM News publication time | Views: 168 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 05-01-2026 News publication date | Time: 08:17 PM News publication time | Views: 168 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words